अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल मध्ये भारतातील पहिला इनसी कार्यक्रम
युरोप नंतर अमृतवाहिनीत झाला इनसी सांस्कृतिक कार्यक्रम
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल मध्ये भारतातील पहिला इनसी कार्यक्रम
संगमनेर । विनोद जवरे ।
गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलने युरोपमध्ये सुरु झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनची प्रगल्भता यावर आधारलेल्या विद्यार्थ्यांनीच वेशभूषा,नेपथ्य, ड्रामा,लाईट डेकोरेशन, संगीत, गायन, लेखन यांसह 26 अविष्कारांनी परिपूर्ण केलेल्या इनसी हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम भारतात प्रथमच अत्यंत शानदार पद्धतीने अमृतवाहिनीच्या प्रांगणात सादर झाला.
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने बर्लिन युरोप यानंतर झालेल्या इनसी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, सौ.शोभाताई कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, पुणे येथील आंतरराष्ट्रीय कलावंत ऋषिकेश पवार, मॅनेजर प्रा विवेक धुमाळ, डॉ एम ए वेंकटेश, डॉ जे.बी.गुरव, प्राचार्य अंजली कन्नवार, सौ.जे बी सेट्टी, शितल गायकवाड, प्रा.जी.बी. काळे, प्रा एस.टी देशमुख ,नामदेव गायकवाड, मा. प्राचार्य केशवराव जाधव, स्नेहल शेकदार, डॉ.संजय मंडकमाले, पालक किरण कडू, श्रीराम पवार, सुभाष सांगळे, स्मिता भिसे, आदींसह पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.इनसी या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात विद्यार्थ्यांनीच कथालेखन, ड्रेपरी, लाईट डेकोरेशन,स्टेज व्यवस्था, बैठक व्यवस्था, संगीत, गायन, डान्स,स्पॉन्सरशिप, यांसह कार्यक्रमाच्या सर्व तयारी इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमधून उस्फूर्त सहभागीत काम केले.
विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर वेळेची आणि पैशाची मूल्य जाणीव व्हावी यासाठी कृतीतून उपक्रम या संकल्पनेतून इनसी हा कार्यक्रम झाला.यामध्ये 40 मिनिटाच्या सलग नृत्यातून 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील डान्स 60 पद्धतीने मधून सर्वांना खिळवून ठेवले. यावेळी असलेली आकर्षक लाईट व्यवस्था आणि इंटरनॅशनल थीम ही भारतात प्रथमच राबवली गेली.तर दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या संत परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी याकरता त्यांची कार्यपद्धती व शिकवण जीवनात आचरणात यावी यासाठी मागील 15 दिवसांपासून आर्टिस्ट इन रेसिडेन्सी या उपक्रमांतर्गत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत जनाबाई,संत गाडगेबाबा या संतांची जीवनशैली व त्यांचे विचार यावर काम केले. सुरुवातीलाच माझी विठ्ठल रखुमाई म्हणत तुकाराम महाराजांचे आगमन झाले. यावेळी तुकाराम महाराजांच्या इंद्रायणी मध्ये बुडवलेल्या गाथेच्या प्रसंगाने उपस्थित त्यांच्या अंगावर शहारे आणले. तर संत चांगदेवांचे गर्वहरण करताना ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत हा प्रसंग काळजाचा ठोका चुकविणारा होता. जनाबाईंच्या भाकरी मधून आलेला विठ्ठल विठ्ठल आवाज आणि त्यानंतर गाडगेबाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवणूक याने सर्वांना भारावून टाकले. या संपूर्ण कार्यक्रमात न्यू इंटरनॅशनल स्कूलच्या 215 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, इनसी कार्यक्रमांमधून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली असून संतांचे जीवन त्यांचे आचरण आणि शिकवण व संदेश यांच्या उपयोग हा विद्यार्थ्यांना होणार असून या संस्काराची शिकवण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावर व समाजावर होणार आहे .आणि याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार असून त्यांचे आयुष्य खूप सुंदर होणार आहे.तर ऋषिकेश पवार म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निओ इंटरनॅशनल स्कूल ने विद्यार्थ्यांकरता आंतरराष्ट्रीय पातळीवरची सुविधा संगमनेर मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने मुंबई पुणे मेट्रो शहराच्या अगोदर संगमनेर मध्ये हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला आहे.यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की या कार्यक्रमातून आम्हाला संयम, मोठ्या व्यक्तींची वागण्याची पद्धत, प्रत्यक्ष आचरण, जीवन जगण्याची कला, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत या अनेक गोष्टी शिकण्यास मिळाले आहे .आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच सकारात्मक जीवन जगण्यासाठी होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अंजली कन्नवार यांनी केले. तर स्नेहल शेकदार यांनी आभार मानले. यावेळी पालक विद्यार्थी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा रंगारंग कार्यक्रम
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या निसर्गरम्य हिरवाईच्या स्वच्छ प्रांगणात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था,लाईट डेकोरेशन, भव्यदिव्य स्टेज, एलईडी,बैठक व्यवस्था,आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाचे केलेले आदर्श आणि डोळे दिपवणारा नेत्रदीपक नृत्याचे कार्यक्रम यामुळे अमृतवाहिनीतील हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.