ब्रेकिंग

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमीत्त सह्याद्री महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमीत्त सह्याद्री महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन

संगमनेर  । विनोद जवरे ।

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव २०२४ निमीत्त सहकारामहर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व श्रीराम कुऱ्हे यांनी दिली आहे.

                तालुक्याच्या विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची मोलाची भूमिका राहिली असून त्यांनी सहकार, शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्याचबरोबर हरित क्रांतीचे प्रेणेते स्व.आण्णासाहेब शिंदे यांनीही कृषीमंत्रीपदाच्या काळात महान कार्य केले. या दोनही महापुरुषांचे कार्य सतत तरुण पिढीला प्रेरणा देणारे असून त्यांच्या स्मरणार्थ सह्याद्री महाविद्यालयात विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे व इंद्रजितभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याचदृष्टीने जानेवारी २०२४ मध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वकृत्वस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्या प्रथम स्पर्धकास जयंती महोत्सवात आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

                या स्पर्धेत एकूण चार गट असणार असून इ ५ वी ते ७ वी या गटासाठी स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जिवनकार्य व संगमनेरच्या विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांचे यांचे योगदान, हे विषय असून इ.८ वी ते १० वी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे विषस असणार आहेत. इ.११ वी ते १२ वी साठी सहकार पंढरीचे वारकरी – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, भारतीय शेतकऱ्यांच्या जिवनातील नवी पहाट सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, कृषी क्रांतीचे दूत डॉ.अण्णासाहेब शिंदे हे विषय राहतील तर वरीष्ठ महाविद्यालयीन गटासाठी संगमनेरच्या ग्रामीण विकासात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांचे यांचे योगदान,सहकारातील राजहंस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,नवस्वातंत्र्य भारतातील हरितक्रांतीचे उपासक डॉ.अण्णासाहेब शिंदे असे विषय असतील या स्पर्धेत इ ५ वी ते ७ वी या वयोगटात प्रथम क्रमांकास रु.१५००/-, द्वितीय क्रमांकास रु.१०००/- , तृतीय क्रमांकास रु.७०० /-,चतुर्थ क्रमांकास ५०० /- तर पंचम क्रमांकास ३०० /- चे बक्षीस देण्यात येणार आहे. इ.८ वी ते १० वी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांकास रु.२०००/-, द्वितीय क्रमांकास रु.१५००/- , तृतीय क्रमांकास रु.१०००/-, चतुर्थ क्रमांकास ७०० /- तर पंचम क्रमांकास ५०० /- चे बक्षीस दिले जाणार आहे. इ.११ वी ते १२ वी साठी प्रथम क्रमांकास रु.२५००/-, द्वितीय क्रमांकास रु.२००० /-, तृतीय क्रमांकास रु.१५०० /-,चतुर्थ क्रमांकास १००० /- तर पंचम क्रमांकास ७०० चे बक्षीस देण्यात येणार आहे. व महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास रु.३००० /-, द्वितीय क्रमांकास रु.२५०० /-, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यास रु.२०००/-,चतुर्थ क्रमांकास १५००/-,तर पंचम क्रमांकास १०००/- चे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच या स्पर्धेत रोख पारितोषिकांसोबत विजेत्या स्पर्धेकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी सह्याद्रीचे रजिस्ट्रार गवांदे बी.आर मो.नं ९४२२३३१४७० /९८२२९६५५३८ व उपप्राचार्य सखाराम खेमनर मो.नं ९९२२०७१३९४ यांचेशी संपर्क साधावा. तरी या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत तालुक्यातील शाळा, महाविद्यालये व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जयंती महोत्सव समिती,सह्याद्री शिक्षण संस्था व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!