ब्रेकिंग

गरजू लेकींना सायकल वाटप प्रकल्पाने आत्मिक समाधान – एसपी राकेश ओला

लायन्स सफायर, संगमनेर शहर पोलीस यांच्या वतीने अभिनव उपक्रम

गरजू लेकींना सायकल वाटप प्रकल्पाने

आत्मिक समाधान – एसपी राकेश ओला

लायन्स सफायर, संगमनेर शहर पोलीस यांच्या वतीने अभिनव उपक्रम

संगमनेर । विनोद जवरे ।

 संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “एक सायकल लेकीसाठी” या नाविन्यपूर्ण प्रकल्पात 25 गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर असणाऱ्या पोलिसांचे हे सामाजिक दातृत्व बघून मला आत्मिक समाधान मिळाल्याचे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रमुख अतिथी राकेश ओला म्हणाले. लायन्स क्लब संगमनेर सफायर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, हेल्पिंग हँड प्राणी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, लायन्स सफायर चे अध्यक्ष अतुल अभंग, हेल्पिंग हँड प्राणी मित्र संघटनेचे अध्यक्ष भूषण नरवडे, लायन्सचे माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सुनीता मालपाणी, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा, पोलीस अधिकारी, लायन्सचे पदाधिकारी, देणगीदार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस विभाग आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने असे उपक्रम व्हायला हवेत. पुढील वर्षी 100 सायकल वाटपाचे उद्धिष्ट ठेवावे असेही अधीक्षक ओला म्हणाले. अशा उपक्रमांतून चांगला सामाजिक संदेश जनतेपर्यंत जातो. नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्यासहित, उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना आपण फोनवर संपर्क करू शकता असे ओला यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की गणेशोत्सव शांतता कमिटीच्या बैठकीत सामाजिक उपक्रमाविषयी चर्चा झाली. हेल्पिंग हँडचे भूषण नरवडे यांनी सायकल वाटप उपक्रमात आघाडी घेतली. लायन्सचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी क्लबच्या माध्यमातून १२ सायकल उपलब्ध केल्या. यात देणगीदारांबरोबरच कल्बनेही ५०% रक्कम उपलब्ध करून दिली. गरजू मुलींचा शोध घेऊन आज प्रकल्प पार पडतोय याचा प्रचंड आनंद असल्याचे मथुरे म्हणाले. लायन्सचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी सामाजिक कार्यात क्लब अग्रेसर असून यापुढेही अशा प्रकल्पात आमचा समावेश असेल असे सांगितले. याआधी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा या शैक्षणिक साहित्य वाटपाचे वितरण प्रकल्प घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब नेहमीच वेगवेगळे प्रकल्प राबवित असतो असे अतुल अभंग यांनी सांगितले.

यावेळी सायकल वाटपाचे देणगीदार यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्ता कासार यांनी केले तर आभार जितेश लोढा यांनी मानले.
देणगीदार – भगवान मथुरे, सागर गोपाळे, देवा भालेराव, अरूण पवार, बाळासाहेब सातपुते, विवेक चव्हाण, के.के.पाटील फाऊंडेशन, समोनाथ काळे, भुषण नरवडे, प्रतिक जाजू (२ सायकल), विवेक बोऱ्हाडे, राजेंद्र गोरडे, नितीन हासे (५ सायकल), राहुल गडगे (३ सायकल), पियुष भंडारी, संदीप गुंजाळ, नितीन ढोकरे, प्रवीण गाडेकर, योगेश गाडेकर, अनिरूध्द डिग्रसकर 
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!