ब्रेकिंग
सैन्यात निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला अभिमान – बाळासाहेब थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सैन्यात निवड झालेल्या 61 युवकांचा सन्मान

संगमनेर । प्रतिनिधी । शेतकरी कष्ट करतो आणि अन्न पिकवतो तर जवान हा ऊन वारा पाऊस अशा कठीण परिस्थितीमध्ये सीमेवर रक्षण करतो. या दोघांचेही देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे महत्त्व असून ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आपल्या कुटुंबाच्या आणि तालुक्याचे नाव मोठे करावे . सैनिकांचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सैन्यात निवड झालेल्या 61 तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, रावसाहेब दुबे, निखिल पापडेजा, सौ लताताई गायकर, सौ सुंदराबाई दुबे, विलास शिंदे, मेजर संदीप गुंजाळ, अशोक लांडगे, भास्कर शर्माळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे अभिजीत बेद्रे, विक्रम खबाले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील सैन्यात व पोलीस दलात निवड झालेल्या 61 युवकांचा व त्यांच्या पालकांचा शाल बुके व झाडांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाचा सैनिक आणि शेतकरी यांच्या जीवावर देश उभा आहे. सैनिक हा सीमेवर ऊन ,वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीमध्ये उभा असतो. आणि त्यामुळे देशातील नागरिक सुरक्षित असतात. युवकांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. परंतु याबद्दल अनेक युवकांनी अत्यंत परिश्रम करून सैन्यामध्ये नोकरी मिळवली आहे. या निमित्ताने देशा तरी जगामध्ये जाण्याची संधी आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा लौकिक वाढवा असे आवाहन करताना निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला आणि आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील युवकांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे. मात्र खडतर परिश्रम करून या युवकांनी यश मिळवले आहे. तालुक्यामध्ये अवैध धंदे अमली पदार्थांची तस्करी वाढली असून यामुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी जाणार आहे. निवड झालेल्या युवकांनी याकडे दुर्लक्ष करून आपल्या करिअरवर लक्ष दिले. संगमनेर मध्ये करिअर अकॅडमी मोठ्या संख्येने असून अनेकांना सैन्यामध्ये जाण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. सैन्यामध्ये निवड होणे हे अत्यंत अभिमानास्पद असून संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे आणि आपल्या परिवारातील विद्यार्थी सीमेवर जात आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांचा गौरव करताना एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाला अभिमान होत असल्याचे ते म्हणाल्या. यावेळी निवड झालेल्या विविध युवकांनी आपले मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केले यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.