प्रत्येक नागरिकाला सर्वांगीण प्रगतीसाठी संगमनेरात मोठी संधी – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
शिक्षण,आरोग्य,व्यापार, शेती या सर्वांसाठी पोषक वातावरण
शिक्षण,आरोग्य,व्यापार, शेती या सर्वांसाठी पोषक वातावरण
संगमनेर ( प्रतिनिधी ) शहरातील व तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान अधिक समृद्ध व्हावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. गुणवत्तेचे शिक्षण,आरोग्य, व्यापार, शेती, उद्योग व्यवसाय आणि सुरक्षित वातावरण या सर्व क्षेत्रांसाठी संगमनेर मध्ये वातावरण पोषक ठरले असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे प्रतिपादन मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ गणेशनगर, मालदाड रोड, अभंग मळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी समवेत दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, इसाक खान पठाण, जावेद शेख, अफजल शेख,नूर मोहम्मद, प्राचार्य हिरालाल पगडाल, सौ.प्रमिला ताई अभंग आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की, भाजपा सरकार विकासा ऐवजी जातीय भेदभावाचे राजकारण करत आहे. राज्यघटनेची मूलभूत तत्वे पायदळी तुडवत आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. येथे महिलांचा सन्मान केला पाहिजे. महिलांवर अत्याचार वाढले आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपूर्ती राबवली आहे. यांना बहिण लाडकी नसून सत्ता लाडकी आहे.

महागाई, बेरोजगारी, भरमसाठ वाढली आहे, या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून बटेंगे तो कटेंगे हे धार्मिक मुद्दे त्यांनी पुढे आणले आहे. हे देशाच्या आणि राज्याच्या हिताचे नाही. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व समाजाला सातत्याने प्राधान्य दिले आहे. योग्य व्यक्तींना संधी दिली आहे. सर्वधर्मसमभावाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण केले आहे. हीच आपली ताकद असून काही लोकांना ही शांतता भंग करायची आहे. आणि त्यांच्या अमिषाला आपल्या तालुक्यातील काही लोक बळी पडतात. हे दुर्दैवी आहे. परंतु चांगले राजकारण टिकवण्याची जबाबदारी आपली आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे राज्यात त्यांना मोठा सन्मान मिळत आहे. राज्यात परिवर्तन अटळ असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आणि या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांना नक्की अत्यंत महत्त्वाचे पद मिळणार आहे. केलेल्या कामामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांचा विजय नक्की आहे. परंतु लढाई आपली मोठ्या मताधिक्यासाठी असून आपण सर्वांनी या तालुक्याच्या अस्मितेच्या लढाईमध्ये सहभागी होत आमदार बाळासाहेब थोरात यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. तर विश्वासराव मुर्तडक म्हणाले की, राहता तालुक्यात मोठी दहशत आहे. ती दहशत इकडे काही लोक आणण्यासाठी धडपडत आहेत. समोर जो उमेदवार उभा आहे. त्याला ना शहराची जाण आहे ना ग्रामीण भागाची. त्याच्या गावात त्यांनी एक काम दाखवावे. फक्त चाललेल्या विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करणे हे त्याचे उद्योग असून तालुक्यातील खबऱ्या म्हणून तो प्रसिद्ध आहे. या खबऱ्याला आता सर्वांनी एकजुटीने त्याची जागा दाखवा असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली या सभेसाठी संगमनेर शहरातील महाविकास आघाडीचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन उद्योजक, व्यापारी, शिक्षण आणि राहण्यासाठी सर्वाधिक पसंतीसंगमनेर मध्ये गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध आहेत. विविध शाळा महाविद्यालय याचबरोबर दर्जेदार वैद्यकीय सुविधा आहेत. भरलेली बाजारपेठ, प्रगत शेती, सर्वधर्मसमभावाचे आणि बंधुतेचे वातावरण, नवीन उद्योजकांसाठी मोठी संधी, शांतता सुव्यवस्था आणि सुरक्षितता याचबरोबर वैचारिक अधिष्ठान असलेल्या संगमनेर शहरात नागरिकांची राहण्यासाठी सर्वाधिक पसंती ठरत असल्याचे मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.



