ब्रेकिंग

दिव्यांग सारथी संघटनेच्या 3500 बांधवांचा आ.थोरात यांना पाठिंबा

दिव्यांग सारथी संघटनेच्या 3500 बांधवांचा आ.थोरात यांना पाठिंबा
संगमनेर ( प्रतिनिधी )
आदिवासी, गोरगरीब,कष्टकरी यांच्याबरोबर अपंग आणि दिव्यांग या विशेष व्यक्तींकरता सातत्याने काम करणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग सारखी संघटनेच्या वतीने 3500 नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

सुदर्शन निवासस्थानी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष विनायक दाभोळकर यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पाठिंबा दिला. यावेळी युवा काँग्रेसचे मुख्य समन्वयक प्रदीप हासे, संतोष हासे,रामहरी कातोरे जिल्हा समन्वयक अन्सार भाई सय्यद,पांडुरंग कासार, वनिता उपाध्ये, विजया कोल्हे, गणेश शेळके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी 500 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आज दिवसभरात 3 हजार कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी विनायक दाभोळकर म्हणाले की, निवडणूक म्हणून नव्हे तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी गोरगरीब आणि विशेष व्यक्तींकरता कायम काम केले आहे. मूकबधिर अंध दिव्यांग या व्यक्तींसाठी सातत्याने मदत करणारे आमदार बाळासाहेब थोरात राज्यातील एकमेव नेते असून आम्ही पक्ष विरहित सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची असून महाराष्ट्रातून सर्व दिव्यांग बांधव आमदार थोरात यांच्या पाठीशी एकवटले आहेत. संगमनेर तालुक्यातील साडे तीन हजार बांधवांनी यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दिला असून 500 कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये दिव्यांग सभागृह उभे करावे अशी मागणी त्यांनी केली.
तर आमदार थोरात म्हणाले की, समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी आपण सातत्याने काम केले आहे. दिव्यांग व मतिमंद मूकबधिर या व्यक्ती समाजासाठी विशेष असून त्यांच्यासाठी काम करण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, मूकबधिर व दिव्यांग व्यक्तींकरता सुरू केलेले विद्यालय हे राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यालय ठरले असून यापुढील काळातही दिव्यांगांसाठी सभाग्रह सह विविध उपक्रम राबवण्यासाठी नियोजन असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी दिव्यांग बांधवांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दिला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!