ब्रेकिंग

महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवण्याची संधी  कोपरगावकरांना – सत्येन मुंदडा

महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवण्याची संधी  कोपरगावकरांना – सत्येन मुंदडा

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपचे प्राबल्य आहे दोन्ही पक्ष महायुतीत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आ. आशुतोष काळे यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात असून महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवण्याची संधी सुद्धा कोपरगावकरांना चालून आलेली आहे.

त्यामुळे सर्व कोपरगावकरांनी एकजूट दाखवून आ. आशुतोष काळेंना महाराष्ट्रातून एक नंबरच्या मताधिक्यांनी निवडून द्यावे असे आवाहन भाजपचे  नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी केले आहे. आ. आशुतोष काळे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भरपूर विकास कामे केली.विकास कामाबरोबरच सर्व जनतेशी संपर्कात राहिले, सर्व समाजाच्या, सर्व जाती-धर्माच्या, सर्व स्तरातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाले. गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस धावून आले. कोविड असो अथवा महापूर असो काळे-कोल्हे यांची यंत्रणा सर्वात पहिले मदतीला असते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून कोपरगावची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. व्यापारी असोसिएशन व गोदाकाठ, एक्सपोच्या माध्यमातून कोपरगावच्या बाजारपेठ वृद्धी साठी सातत्याने प्रयत्न केले आमदार असूनही अतिशय नम्रपणे, कोणताही बडेजाव न बाळगता जनतेशी संपर्कात राहिले.त्यांच्या या कामाची पावती म्हणून सर्व कोपरगावकरांनी एकजूट दाखवून येत्या २० तारखेला आ.आशुतोष काळे यांना महाराष्ट्रात नंबर एकच्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन सत्येन मुंदडा यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!