एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्यसाधना शिबिर
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्यसाधना शिबिर

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्यसाधना शिबिर
संगमनेर । विनोद जवरे । नाशिक जिल्ह्यातील नंदा हिल्स इगतपुरी येथील सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक अशा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वात अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून शासकीय योजनेअंतर्गत तसेच शासकीय योजनेत न बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत शिबिर आरोग्यसाधना दिनांक १ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केले असून या शिबिरात राज्यातील सर्वच गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान एसएमबीटी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदयविकार शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, मेंदू व मणके विकार उपचार व शस्त्रक्रिया, पोट विकार उपचार व शस्त्रक्रिया, अस्थिरोग व सांधेरोपण उपचार व शस्त्रक्रिया, जनरल शस्त्रक्रिया, कान नाक घसा उपचार व शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसुती शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया उपचार शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहे तरी अधिक माहितीसाठी ०२५३ ६९४०००० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.



