देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई । प्रतिनिधी ।
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे १९ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह एनडीएमधील मित्रपक्षांचे नेते यांच्या साक्षीने देवेंद्र फडणवीस गुरुवार, ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली.

विशेष उपस्थिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित होते.



