सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन
संगमनेर । प्रतिनिधी । – स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 1ते 5 जानेवारी ते जानेवारी 2025 या काळामध्ये तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री संस्थेचे रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे यांनी दिली आहे .याबाबत अधिक माहिती देताना गवांदे म्हणाले की, महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही हा जयंती महोत्सव भव्यदिव्य होणार असून शालेय विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
.
यामध्ये 5 वी ते 7 वी करता स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात व मोबाईलच्या जगात हरवले कुटुंब ही विषय आहेत तर 8 वी ते 10 वी या वर्गांसाठी संगमनेर तालुक्याची दीपस्तंभ स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व महात्मा गांधी यांची शिकवण या विषयावर मनोगत व्यक्त करायचे आहे. अकरावी बारावी या वर्गांकरिता कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे व विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल या विषयावर विद्यार्थ्यांनी बोलावे तर वरिष्ठ महाविद्यालय गटांमध्ये सहकारातील राजहंस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व भारतातील युवकांची जागतिक युवक म्हणून वाटचाल या विषयांवर मनोगत व्यक्त करावयाचे आहे.प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने आपल्या स्तरावर 23 डिसेंबर 2024 पर्यंत स्पर्धा आयोजित करून गटनिहाय प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकास तालुका स्पर्धेसाठी पाठवणे आवश्यक आहे याकरता संजय आहेर 8600135100 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या तालुकास्तरीय स्पर्धा सहा जानेवारी 2025 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात होणार आहे या स्पर्धेतील लहान गट प्रथम क्रमांकात साठी 1500 रुपये आठवी ते दहावी प्रथम क्रमांक 2000 रुपये अकरावी बारावी साठी 2500 रुपये, तर महाविद्यालयीन गटासाठी तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे याचबरोबर द्वितीय तृतीय चतुर्थ व पंचम क्रमांकाचेही रोख बक्षीस दिले जाणार आहे. या विजेत्यांना जयंती महोत्सवाच्या मुख्य समारोहात ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बाबुराव गवांदे प्रा. बाबा खरात, सखाराम खेमनर, डॉ. राजेंद्र जोरवर गोरक्ष भवर प्रयत्न करत आहेत.तरी या वकृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अमृत उद्योग समूह, जयंती महोत्सव समिती व वकृत्व स्पर्धा नियोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे



