ब्रेकिंग

कोणत्‍याही मंत्रीपदाची जबाबदारी आली की, त्‍या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्‍याची क्षमता ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वात

कोणत्‍याही मंत्रीपदाची जबाबदारी आली की, त्‍या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्‍याची क्षमता ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वात

लोणी । प्रतिनिधी ।

राज्‍याच्‍या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्‍व आणि सात वेळा विविध विभागांच्‍या मंत्रीपदाची यशस्‍वी धुरा सांभाळणारे ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा महायुतीच्‍या मंत्रीमंडळात दुस-यांदा झालेला समावेश अहिल्‍यानगरच्‍या राजकीय क्षेत्रात वर्चस्‍व सिध्‍द करणारा ठरला आहे.महायुतीला दहा जागांवर मिळवून दिलेले घवघवीत यश,सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व आणि भाजपा नेत्याचा सार्थ ठरवलेला विश्वास यासाठी कारणीभूत ठरला आहे.

सहकार चळवळीची असलेली पार्श्‍वभूमी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या राजकीय सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्‍हणून वाटचाल करणारे ना.विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्‍थांची पद भूषवून या क्षेत्रात नाविन्‍याची निर्मिती केली. सहकारा बरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्‍यांनी आपल्‍या दुरदृष्‍टीकोनातून संस्‍थाचा पाया अधिक भक्‍कम केला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍यास पुर्ण झालेली ७५ वर्ष, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेची ५० वर्षांची यशस्‍वी वाटचाल आणि सहकारी बॅकींग क्षेत्रात नावलौकीक प्राप्‍त केलेल्‍या प्रवरा सहकारी बॅकेस पुर्ण झालेले ५० वर्ष यासर्वांमार्ग ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे अभ्‍यासू नेतृत्‍व उपयुक्‍त ठरले आहे.१९९५ पासून शिर्डी विधानसभा मतदार संघाचे त्‍यांनी प्रतिनिधीत्‍व केले. राहाता तालुक्‍याच्‍या निर्मिती पासून ते अलिकडच्‍या काळात स्‍थापन झालेले अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालय, काकडीचे विमानतळ, न्‍यायालयाची स्‍वतंत्र इमारत अशा अनेक ठळक बाबी या त्‍यांच्‍या विकासाच्‍या वाटचालीतील मानबिंदु ठरले आहेत. विकास कामांच्‍या सक्रीयतेमुळेच शिर्डी मतदार संघातून सलग आठव्‍यांदा चांगल्‍या मताधिक्‍याने निवडून जाण्‍याचा विक्रमही त्‍यांनी नोंदविला आहे.

कोणत्‍याही मंत्रीपदाची जबाबदारी आली की, त्‍या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्‍याची क्षमता ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वात आहे. सरकार आणि संघटना यांचा योग्‍य समन्‍वय साधून काम करण्‍याचा मोठा अनुभव ना.विखे पाटील यांच्‍या पाठीशी असल्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेला यामुळे गती मिळाल्‍याचे पाहायला मिळाले. यापुर्वी भाजप सेनेचे सरकार असताना १९९७ ते ९९ या कार्यकाळात कृषि, जलसंधारण, दूग्ध व्‍यवसाय या विभागांची जबाबदारी त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आली होती. अॅग्रो अॅडव्‍हाटेज हे कृषि क्षेत्रातील अंतरराष्‍ट्रीय प्रदर्शन भरवून त्‍यांनी आपल्‍या कार्याची वेगळी ओळख दाखवून दिली होती.शालेय शिक्षण, विधी व न्‍याय, परिवहन, बंदरे विकास, गृहनिर्माण मंत्री म्‍हणून त्‍यांनी लोकहिताचे निर्णय घेण्‍यास प्राधान्‍य दिले. अनुदानित शाळांसमोरील कायम शब्‍द काढण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय त्‍यांनी घेतल्‍यामुळेच अनुदानित शाळांचा मोठा प्रश्‍न सोडविण्‍यात यश आले. स्‍कुलबसचे धोरणही त्‍यांच्‍याच कार्यकाळात राज्‍यात लागु करण्‍यात आले होते.

२०१९ नंतर ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी भाजपात जाण्‍याचा निर्णय घेतला. दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी डॉ.सुजय विखे पाटील यांना मिळवून मोठा विजय मिळविला. त्‍यानंतर जिल्‍हा पुर्णपणे भाजपमय करण्‍यासाठी त्‍यांचे विशेष प्रयत्‍न राहीले. मागील अडीच वर्षात राज्‍यात स्‍थापन झालेल्‍या महायुती सरकारमध्‍ये महसूल मंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्‍वाने त्‍यांच्‍यावर सोपविली. या माध्‍यमातून राज्‍याच्‍या हिताची निर्णय त्‍यांनी घेतले.अहिल्‍यानगरचे पालकमंत्री म्‍हणून शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून त्‍यांनी महायुती सरकारच्‍या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. प्रशासनाच्‍या सहकार्याने योजनांच्‍या अंमलबजावणीत अहिल्‍यानगर जिल्‍हा राज्‍यात प्रथम क्रमांकावर आणण्‍यात ना.विखे पाटील यांचे प्रयत्‍न महत्‍वाचे ठरले.जिल्‍ह्याच्‍या दृष्‍टीने तीन औद्योगिक वसाहतींना उपलब्‍ध करुन दिलेले जागा, निळवंडे धरण कालव्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी केलेला पाठपुरावा, गोदावरी कालव्‍यांच्‍या नुतणीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा उपलब्‍घ केलेला निधी, सावळीविहीर येथे मंजुर झालेले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, काकडी विमानतळाच्‍या टर्मिनल इमारतीसाठी मंजुर झालेला ६०० कोटी रुपयांचा निधी निधी उपलब्‍ध करुन मतदार संघाच्‍या विकासाला मोठी गती दिली आहे. जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीमध्‍ये येणारे उद्योग ही मोठी उपलब्‍धी त्‍यांच्‍या कार्यकाळात ठरली आहे.भविष्‍यात अहिल्‍यानगर शहरामध्‍ये पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे राष्‍ट्रीय स्‍मारक उभारणे आणि श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्‍वर सृष्‍टीची उभारणी हा त्‍यांचा संकल्‍प असून, जिल्‍ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नवी दिशा देण्‍याचाही त्‍यांचा प्रयत्‍न असणार आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात त्यांनी योग्य समन्वय घडवून उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जाणीव ठेवून संघटनात्मक पातळीवर त्यांनी योग्य लक्ष केंद्रीत करून मित्र पक्षांमध्येही चांगला संवाद ठेवाल्याचा परीणाम या यशामागे दिसून येतो.महायुती मधील जबाबदारी मह्णून त्यांनी आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात कुठेही वादग्रस्त न ठरता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात तेवढीच प्रखर भूमिका मांडली.
सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांनी भाजपा मध्ये निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय ठरत आहेच.परंतू विधानसभा निवडणुकीत काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यात बजावलेल्या महत्वपूर्ण  भूमिकेमुळे भाजपाच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांचा सार्थ ठरवलेला विश्वास यासाठी कारणीभूत ठरला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!