मनोज जरांगे पाटील मंगळवारी पंचाळेत
मनोज जरांगे पाटील मंगळवारी पंचाळेत

पंचाळे । विनोद जवरे ।
पंचाळे येथे दहा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गंगागिरी महाराज यांच्या फिरत्या नारळी सप्ताह सुरुवात होणार आहे. या सप्ताहास 13 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील भेट देणार आहे सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून मंडप उभारणी स्टेज स्वयंपाक गृह रस्ते विद्युत वितरण हे सर्व कामे पूर्ण झाली आहे .या सप्ताहाच्या निमित्ताने मराठा समाज आरक्षणाचे आंदोलनकरते मनोज जरांगे पाटील हे मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पंचाळे येथे येणारा असून ते साधुसंत महंत यांचा आशीर्वाद घेणार आहे.तसेच ते भाविकांशी संवाद साधणार आहे.म्हणून जरांगे पाटील यांच्या या दौऱ्या बाबत दौऱ्याबाबतच्या नियोजना संदर्भात सप्ताह समितीची बैठक नुकतीच भजन मंडपामध्ये संपन्न झाली यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ पांगरकर यावेळी उपस्थित होते. जरांगे पाटील यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी सप्ताह समितीने विलास भाऊ पांगरकर यांच्यावर सोपवली होती त्यामुळे सप्ताह कमिटीच्या जबाबदारीचा मान राखून विलास भाऊ पांगरकर ही स्वतः मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी गेले. व गावी जाऊन सप्ताहाची व्हीआयपी पत्रिका देऊन आमंत्रण दिले व त्यांना सप्ताहास भेट देण्याची गळ घातली. त्यांच्या विनंतीचा मान राखून जरांगे पाटील यांनी सप्ताह भेट देण्याचे निश्चित केले असून मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जरांगे पाटील सप्ताह स्थळी येणार आहे
यावेळी बैठकीमध्ये विलास भाऊ पांगारकर सप्ताह समितीचे सप्ताह नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले .यावेळी विलास भाऊ पांगरकर ,संभाजी जाधव, अरुण थोरात, काका पवार, अण्णासाहेब खाडे ,गणेश थोरात, सोमठाण्याचे सरपंच भारत शेठ कोकाटे ,सिन्नर बाजार समितीचे माजी संचालक परशुराम कथले, शिवाजी तळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बेलोटे ,राजेंद्र डुंबरे सर हे उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील हे 12 ऑगस्ट रोजी शिर्डी येथे मुक्कामी असून सकाळी वावी पांगरी मार्गे ते सप्ताह स्थळी येणार आहे. या संदर्भात मुसळगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बाविस्कर यांनी पंचाळे येथील सप्ताह स्थळाची पाहणी केली जरांगे पाटील यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत करावयाच्या उपायोजनांचा आढावा घेतला. त्यामुळे जरांगे पाटील यांचा दौरा निश्चितच असल्याची माहिती विलास भाऊ पांगरकर व संभाजी पाटील जाधव यांनी दिली



