ब्रेकिंग

थोरात सह. साखर कारखान्याच्या 1 लाख 80 हजार 911 साखर पोत्यांचे पूजन..

थोरात सह. साखर कारखान्याच्या 1 लाख 80 हजार 911 साखर पोत्यांचे पूजन..

संगमनेर (प्रतिनिधी) – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक ,कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. या कारखान्यातून सन 2024 -25 या गळीत हंगामातील उत्पादित झालेल्या पहिल्या 1 लाख 80 हजार 911 साखर पोत्यांचे पूजन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील उत्पादित केलेल्या या पोत्यांचे पूजन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी समवेत कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा.चेअरमन संतोष हासे ,अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, संचालक भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, संभाजी वाकचौरे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, इंजिनीयर नवनाथ गडाख,भाऊसाहेब खर्डे, अशोक मुटकुळे, भारत देशमुख आदींसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने कायम सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. उच्चांकी की भाव देण्याची परंपरा कायम जपली असून चालू हंगामातही 10 लाख मेट्रिक टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. कारखान्याचे काम हे सतत चालणाऱ्या चाकांचे आहे आणि त्यामुळे परमेश्वराचा आशीर्वाद महत्त्वाचा असून कारखाना व वीज निर्मितीमुळे कारखान्याने कायम ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठी मदत केली आहे.

सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे . हीच विकासाची वाटचाल आपल्याला यापुढे कायम ठेवायची असून यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

तर बाबा ओहोळ म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हा कारखाना देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. साखर उद्योगांमध्ये अनेक अडचणी असतात. मात्र तरीही या अडचणींवर मात करून कारखान्याने कायम ऊस उत्पादक व शेतकरी यांचे हित साधले आहे.तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की तालुक्याच्या कार्यक्षेत्रात 3.5 लाख मे. टन ऊस उपलब्ध आहे. बाहेरील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा कारखान्यावर मोठा विश्वास असून यावर्षी 10 लाख मेट्रिक टना पेक्षा जास्त गाळप होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी केले .यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!