मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सावरगाव घुले येथील जळीत झालेल्या कुटुंबीयांना मदत
मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सावरगाव घुले येथील जळीत झालेल्या कुटुंबीयांना मदत
संगमनेर ( प्रतिनिधी ) सावरगाव घुले येथील बेलसोंडा या वाडी मधील सौ. मंगल सिताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीतून त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळाल्याने घुले कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मदतीचा हात दिला असून यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा व गृह उपयोगी साहित्य देण्यात आले.

सावरगाव घुले शिवारातील बेलसोंडा येथे रात्री आगीतून झालेल्या नुकसानीतून आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने या कुटुंबीयांना मदत देण्यात आली यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, जनसेवक विलास घुले, अर्जुनराव घुले,माजी सरपंच बाबाजी घुले, भाऊसाहेब घुले, उपसरपंच नामदेव घुले, सिताराम घुले, जनाबाई घुले, सविता घुले, संतोष बन्सी ढगे, गोरख खरात, लहानु घुले, पाराजी घुले, सावळेराम घुले, तलाठी गबाले व ग्रामसेवक जाधव आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी रात्री उशिरा बेलसोंडा वस्तीवरील सौ.मंगल सिताराम घुले यांच्या घराला लागलेल्या आगीतून कौलारू घराचे व साहित्याचे मोठे नुकसान झाले. गरीब परिस्थिती असलेल्या घुले कुटुंबीय हे उघड्यावर पडले असून सकाळी या घटनेची माहिती मिळताच नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. यानुसार यशोधन कार्यालयातून आदिवासी सेवक प्रा बाबा खरात व जनसेवक घुले इतर कार्यकर्ते किराणा साहित्य व गृह उपयोगी साहित्य घेऊन या भेट घेऊन त्यांना तातडीची मदत दिली.याप्रसंगी बोलताना प्रा.बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला. प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि अडीअडचणी ते उभे राहिले. अनपेक्षित पणे घुले कुटुंबीयांवर हे मोठे संकट कोसळले असून या संकटांमध्ये तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीची मदत दिली आहे. सातत्याने गोरगरिबांना मदत करणारा नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे. सत्ता असो वा नसो लोकनेता कायम काम करत असतो आणि तो गोरगरिबांच्या हृदयात असतो. यापुढील काळातही विविध योजनांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना मदत केली जाईल असे ते म्हणाले.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने माजी संचालक अर्जुनराव घुले म्हणाले की य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम पठार भागावर मोठे प्रेम केले असून या भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबवले आहेत याचबरोबर अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. रात्री घडलेल्या दुर्घटनेतून या कुटुंबावर संकट आले असून यशोधन कडून मिळालेल्या मदतीने नक्कीच दिलासा मिळणार आहे .यावेळी घुले कुटुंबीय व सावरगाव घुले ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले
मदतीने घुले कुटुंबीय गहिवरले
तालुक्याचे कुटुंबप्रमुख माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी नागपूर मध्ये आहेत .परंतु रात्री घडलेल्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मदत पाठवली. ते कायम जनतेच्या सुखदुखात पाठीशी राहतात. त्यांनी कायम जनतेच्या सुखासाठी काम केले आहे. त्यांच्या मदतीने आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला असल्याचे सौ मंगल ताई घुले यांनी म्हटले असून या मदतीने सर्व घुले कुटुंबीय यांना गहिवरून आले.



