ब्रेकिंग

पिंपळगाव देपा येथील जळीत झालेल्या अभंग कुटुंबियांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून तातडीची मदत.

पिंपळगाव देपा येथील जळीत झालेल्या अभंग कुटुंबियांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून तातडीची मदत.
यशोधन कार्यालयाकडून किराणा व संसार उपयोगी साहित्य

संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून पिंपळगाव देपा येथील काल जळीत झालेल्या अभंग कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून संसार उपयोगी साहित्य, किराणा व घरगुती वापराची भांडी देऊन मदत करण्यात आली. पिंपळगाव देपा येथे अभंग कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना किराणा भांडी व घरगुती साहित्य देण्यात आले यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात,सरपंच अलका मिंडे, ज्ञानदेव रावसाहेब मिंडे, संतोष घाणे बाबासाहेब गांजवे ,लक्ष्मण खेमनर ,साहेबराव हजारे, शिवाजी हजारे ,पाराजी हजारे ,साहेबराव अभंग, जनसेवक रोहिदास नागरे, सतीश शेजवळ आदी  उपस्थित होते.
 

पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागली. यात सोन्याचे तीन लाख 25 हजार रुपयांचे दागिने, एक लाख 75 हजार रुपये रोख रक्कम, 15 पोते धान्यांसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे हे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच बीड येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी यशोधन कार्यालयास तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. व या कुटुंबीयांना मदतीसाठी किराणा व इतर साहित्य पाठवण्यात आले.यावेळी बोलताना आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याची कुटुंबप्रमुख आहेत . त्यांनी सातत्याने वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मदतीसाठी  कायम काम केले आहे. नवीन घर बांधण्याचे स्वप्न असलेल्या अभंग कुटुंबीयांसोबत झालेली ही घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी सावरगाव घुले येथील बेलसोंडा येथेही अशीच घराला आग लागून त्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. आणि आज अभंग कुटुंबाचे नुकसान झाले आहे या कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणालेतर सरपंच सौ अलका मिंडे म्हणाल्या की, अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीने अभंग कुटुंब अडचणीत सापडले आहे त्यांना तातडीची मदत गरजेची असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मदत केली आहे याच बरोबर यापुढील काळातही विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम केले जाईल असे त्या म्हणाल्या.
यावेळी पिंपळगाव देपा गावातील विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!