अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला कोरियाच्या टीसीएसच्या प्रमुखांची भेट
टीसीएसचे कंट्री हेड रमेश अय्यर यांच्याकडून अमृतवाहिनी संस्थेचा गौरव पूर्ण उल्लेख
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला कोरियाच्या टीसीएसच्या प्रमुखांची भेट
टीसीएसचे कंट्री हेड रमेश अय्यर यांच्याकडून अमृतवाहिनी संस्थेचा गौरव पूर्ण उल्लेख
संगमनेर ( प्रतिनिधी ) भारत आणि दक्षिण कोरिया यामध्ये टेक्नॉलॉजी, संशोधन, औषधी वनस्पती या विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना मोठी संधी असून ग्रामीण विभागात असूनही अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्ता पूर्ण घडवलेले विद्यार्थी हे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करतील असा विश्वास व्यक्त करताना अमृतवाहिनी संस्थेतील अद्यावत शिक्षण प्रणालीचा कोरिया देशातील टीसीएस कंपनीचे प्रमुख रमेश अय्यर यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला टीसीएस कोरियाचे कंट्री हेड रमेश अय्यर पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक ॲडव्हायझर डॉ.दिनेश अंमळनेरकर यांनी भेट दिली.यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवनवीन संशोधन प्रणाली व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असून या माध्यमातून कोरिया देशातील टीसीएस कंपनीचे कंट्री हेड रमेश आहेर यांनी टीसीएस कंपनी व अमृतवाहिनी यामधील समन्वय अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने सदिच्छा भेट दिली.
यावेळी बोलताना रमेश अय्यर म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरानंतर संगमनेर हे शिक्षणाचे दुसरे माहेर घर बनले आहे. अमृतवाहिनी संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण प्रणाली ग्रामीण भागात राबवून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले आहे. आगामी काळामध्ये कोरिया आणि भारत यांच्यामध्ये व्यावहारिक संधी बरोबर शैक्षणिक संशोधन महत्त्वपूर्ण राहणार आहे. याचबरोबर विविध उपलब्ध असलेले मार्केट, टेक्नॉलॉजी, औषधी वनस्पती या क्षेत्रांमध्ये ही मोठी संधी आहे. टीसीएस मध्ये अमृतवाहिनी संस्थेतील अनेक विद्यार्थी कार्यरत असून आगामी काळात या दोन्ही संस्थांमध्ये चांगला समन्वय राहून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी अमृतवाहिनी ची सर्व टीम सामूहिकपणे प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळत असल्याचे मोठे समाधान आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव यांनी केले. याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चे प्रेसिडेंट अमित कोल्हे, प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश, डॉ.बी.एम.लोंढे,डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते प्राचार्य व्ही बी.धुमाळ, प्राचार्य जे.बी सेठी, श्रीमती शीतल गायकवाड, अंजली कन्नावार, विलास भाटे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाघ , संगमनेर मेडिकल फाउंडेशनचे राहुल गुंजाळ हेही उपस्थित होते.