अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

संगमनेर ( प्रतिनिधी ) गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यासाठी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या वतीने झालेले अमृतरंग वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी या वार्षिक स्नेहसंमेलन 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख संस्थेचे माजी विद्यार्थी स्क्रीबर फुड्सचे अनिकेत साबळे, असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल भोसले प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी संस्थेचे माजी विद्यार्थी हा संस्थेचा अभिमान आहे. अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अमृतवाहिनीचा लौकिक वाढवला आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांबरोबर व्यवहार ज्ञान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे देण्यासाठी अमृतवाहिनी संस्थेतून काम केले जात आहे .याचबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन व मेधा हे उपक्रम आहेत. यामधून अनेक विद्यार्थी सहभाग घेत असून या वार्षिक स्नेहसंमेलनाची वैशिष्ट्य म्हणजे सर्व तयारी विद्यार्थी करत असतात. स्टेजवरील तयारी आणि स्टेज च्या पाठीमागील तयारी सुद्धा विद्यार्थ्यांची असते आणि त्यामुळे कार्यक्रमांचे नियोजन हे विद्यार्थ्यांना परिपूर्ण कळते.
याचबरोबर पालक आणि शिक्षक यामध्ये एक जिव्हाळा निर्माण होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला चांगली दिशा देण्यासाठी अधिक बळकटी मिळते. तर अनिकेत साबळे म्हणाले की विद्यार्थ्यांना शाळेतूनच मूल्य आणि कौशल्य याचे ज्ञान मिळते आणि अमृतवाहिनीतून शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्य सातत्याने रुजवली जातात.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी डान्स ,गीत गायन, नाटक ,सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य, पोवाडे, जागरण गोंधळ असे विविध महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .सुंदर वेशभूषा,भव्यदिव्य स्टेज, आकर्षक सजावट यामुळे हे वार्षिक स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले या कार्यक्रमासाठी मुंबईचे घनश्याम सोनवणे व सोनम पुणेकर यांनी परीक्षक म्हणून काम केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शितल गायकवाड यांनी केले.या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व्ही बी धुमाळ,अकॅडमी डायरेक्टर जे.बी.गुरव, प्राचार्य शितल गायकवाड, शोभा हजारे, डग मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.