ब्रेकिंग
डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला दिली भेट
डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला दिली भेट



शेतात काम करून घरी परत असताना तीस वर्षीय महिला अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने संगमनेर येथील कुटे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले. या घटनेमुळे हिवरगाव पावसा परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही माहिती कळताच संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष तथा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये जाऊन सौ.अर्चना टेमगिरे यांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. याचबरोबर बिबट्यांचा संचार मानवी वस्तीत वाढला आहे. याबाबत वेळोवेळी आपण तक्रारी केल्या आहेत. वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी डॉ. प्रदीप कुटे, हिवरगाव पावसा येथील कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.डॉ.जयश्रीताई थोरात यांनी कायम गोरगरीब माणसांच्या कल्याणासाठी काम केले आहे. राजकारणाविरहित त्या कायम जनतेच्या संपर्कात असून माझ्यावर अचानक हल्ला झाला मला कळाले सुद्धा नाही. माझ्या कुटुंबासाठी व माझ्या मुला बाळांसाठी हे मोठे संकट होते. सर्वांच्या कृपाशीर्वादाने मला जीवदान मिळाले असून डॉक्टर जयश्री ताई थोरात यांच्या भेटीने बळ मिळाले असल्याचे सौ.अर्चना टेमगिरे यांनी म्हटले आहे.