ब्रेकिंग

महसूल मंत्री असताना धाडसी निर्णय विखे पाटील यांनी घेतल्यामुळेच उद्योजकांना जमीन उपलब्ध झाली – मंत्री उदय सामंत

महसूल मंत्री असताना धाडसी निर्णय विखे पाटील यांनी घेतल्यामुळेच उद्योजकांना जमीन उपलब्ध झाली – मंत्री उदय सामंत

शिर्डी । प्रतिनिधी । राज्यातील महायुती सरकारने नेहमीच  उद्योजकांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली असून,परकीय गुंतवणुकीत आपले राज्य प्रथम स्थानी आले आहे.कोणत्याही उद्योगाला तीस दिवसात परवानगी आणि ८०टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण घेतल्याने राज्याच्या औद्यगिक विकासाची निर्णय प्रक्रीया पारदर्शकपणे होत असल्याची माहीती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या कौशल्यवर्धिनी प्रशिक्षण केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे भूमिपुजन मंत्री उदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी आ.अमोल खताळ डॉ सुजय विखे पाटील सभापती ज्ञानेश्वर गोंदकर माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके रविंद्र गोंदकर स्वाधिन गाडेकर टाटा टेक्नॉलॉजीचे सीएमओ प्रीतम गांजेवार कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख सुशिलकुमार संस्थानचे सीईओ गोरक्षनाथ गाडीलकर उद्योग विभागाचे गणेश राठोड आदी याप्रसंगी उपस्थित होते.


आपल्या भाषणात मंत्री सामंत म्हणाले की,औद्यगिक वसाहती मध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी उद्योजक रतन टाटा यांच्या माध्यमातून आठशे कोटी रुपये मंजूर झाले.यातूनच शिर्डीच्या औद्योगिक वसाहती मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी डॉ सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला.महसूल मंत्री असताना धाडसी निर्णय विखे पाटील यांनी घेतल्यामुळेच उद्योजकांना जमीन उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.आज राज्यात परीकय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे.महायुती सरकारच्या कामाचा परीणाम आहे.पहीले अडीच वर्ष आपण पाहीली.दावोस परीषदेमध्ये १५लाख कोटी रुपयांचे करार झाले.त्यापैकी ऐंशी टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील ज्या भागात उद्योग उभे राहात आहेत तिथे स्थानिक युवकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.शिर्डी मधील कौशल्य प्रशिक्षण केंद्रातून सात हजार युवकांना प्रशिक्षणाची संधी आहे.फक्त आता शिकण्याची तयारी ठेवली पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करून अहील्यानगर जिल्ह्यासाठी जेम्स अॅण्ड ज्वेलरी कंपनीचे केंद्र देण्याची व्यवस्था करतो यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची ग्वाही देवून या कंपनीला असंख्य प्रशिक्षित युवकांची गरज लागणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

जाहिरात – मो-7756045359

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,आजचा दिवस खूप ऐतिहसिक आहे.या भागातील युवकांच्या भवितव्याच्या दृष्टीने मोठे पाउल टाकले गेले आहे.शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून रोजगाराची संधी निर्माण होईल.विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात कौशल्य विकासाचा मोठाअसल्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.प्रशिक्षणातून युवकांना मिळणारा अनुभव उद्याच्या औद्यगिक विकासाला उपयुक्त ठरणार असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकासाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून १लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात आली.अतिशय धडाडीने औद्योगिक विकासासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करून उद्योग येणार असले तरी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे.यासाठी पारंपारीक पायाभूत प्रशिक्षणामध्ये बदल करण्याची भूमिका घेवून औद्यगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागेल आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!