ब्रेकिंग

जिद्दीला आई व भावाच्या कष्टाची जोड; कोपरगावची कन्या होणार पोलीस उपाधीक्षक?

एम.पी.एस.एस परीक्षेत मिळविले घवघवीत यश

जाहिरात – मो-7756045359
जिद्दीला आई व भावाच्या कष्टाची जोड; कोपरगावची कन्या होणार पोलीस उपाधीक्षक?

एम.पी.एस.एस परीक्षेत मिळविले घवघवीत यश

कोपरगाव । विनोद जवरे । मनाशी जिद्द, भविष्याचे ध्येय परिस्थितीची जाण उराशी बाळगत लाल दिव्याच्या गाडीने फिरायचं या ध्येयाने झपाटून अभ्यास करत अखेर आपल्या कष्टाच्या जोरावर नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात कोपरगाव येथील नगरपालिका महिला सफाई कर्मचाऱ्याची मुलगी तसेच रस्त्यावर चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणाऱ्या भावाची बहीण १५ वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनचा वर्षा होत आहे.

आमचे कुटुंब पूर्णपणे निरक्षर असल्याने आम्हाला यातील काहीच कळत नाही परंतु माझ्या ताईने मिळवलेले हे यश आमच्या सर्व कुटुंबाच्या पुण्याईचे व तिच्या अहोरात्र कष्टाचे फळ आहे.

ज्ञानेश्वर पवार
(उषा पवार यांचा भाऊ)

नुकत्याच एम.पी.एस.सी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेली कोपरगाव शहरातील उषा गंगाधर पवार हिने आपले कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करत आपल्या वडिलांचे छत्र गमावल्यानंतर आपले आई व भाऊ यांचे दिवस-रात्र करत असलेल्या कष्टाची जाण डोळ्यासमोर ठेवत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुणे येथील एका अभ्यासकेंद्रात प्रवेश घेत केंद्राचे संचालक दिलीप खाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू करत तहानभूक, घरचे नातेवाईकांचे शुभकार्य, सणवार, तसेच कुटुंबापासून अनेक वर्ष दूर राहत अत्यंत जिद्दीने उपजिल्हाधिकारी सौरभ रंगाटे, अजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिली व गुरुवारी जाहीर झालेल्या त्या परीक्षेच्या निकालात ५०८.५० गुण तसेच तोंडी परीक्षेत ६५ गुण मिळवत १५ वा क्रमांक मिळून यश मिळवल्याचे समजताच संपूर्ण कोपरगाव शहरासह सुभाषनगर परिसरात दुसऱ्यादा दिवाळी साजरी झाली तिचा या यशामुळे ती कोपरगाव तालुक्यातील किंबहुना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली महिला पोलीस उपाधीक्षक होऊ शकते त्यामुळे नक्कीच कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे.

माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे माझ्या आईने व भावाने मला १०-१० रुपये करून शिक्षणासाठी पैसे पुरवले तर मी देखील पुणे येथील जेवणाच्या मेस मध्ये भांडे घासत पैशाची गरज भागवली. त्यामुळे मी हे सांगू इच्छिते की आपल्या उराशी एक जिद्द असेल तर त्यावर आपण आपल्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय यशस्वीपणे गाठू शकतो मला यासाठी बहुमूल्य साथ मिळाली ती माझी आई व भाऊ मी यांचे उपकार जन्मभर विसरू शकणार नाही माझ्यासाठी साक्षात हे देवच आहे.

– उषा पवार

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!