ब्रेकिंग

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा कोपरगावात संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा कोपरगावात संपन्न

कोपरगाव । प्रतिनिधी ।

ग्रामपंचायत ही ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असून या संस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या सभासदांचा अहिल्यानगर जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात रविवारी १२ जानेवारी रोजी कोपरगाव येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ ही नेहमीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढत असते या संघटनेचे संस्थापक तथा सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप डिके, राज्य संपर्कप्रमुख दिगंबर सोनटक्के, सचिव आत्माराम घुणे, जिल्हा कार्याध्यक्ष रामदास ससाने, उपाध्यक्ष संतोष नाईकवाडी, गणेश ईधाटे, संघटक मनीष वैराळ, जिल्हा सदस्य बाळासाहेब शिंदे, त्रिंबक पाचरणे, सुजित कदम, शकील पठाण, शब्बीर शेख, विजय शिंदे आदींसह जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या मेळाव्यात सन २०२४ ची तालुका निहाय सभासद नोंदणी अहवाल घेऊन जिल्ह्यात १ हजार ११ सभासद नोंदणी झाल्याबदल सर्व तालुका पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्हा स्तरावरील जमा खर्च अहवाल सभेत सादर केला असता त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली त्यासोबतच संघटनेच्या नावाने खाते उघडणेबाबत तसेच जिल्हा कार्यकारिणीची महिन्यातुन एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले तर सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत चर्चा करत त्यावर सर्वाना वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थित मान्यवरांचे आभार कोपरगावचे तालुका कार्याध्यक्ष सुजित कदम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगाव तालुका संघटनेचे पदाधिकारी सतीश ब्राह्मणे यांनी केले तर मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष भरत साबळे उपाध्यक्ष नारायण शिंदे, राजीव वेलजाळे सचिव ज्ञानदेव वारकर , सहसचिव आकाश गुंजाळ आदींसह संघटनेचे कार्यकारणी सदस्य तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!