बहादरपूरच्या श्रीशा आहेर हिने साकारलेली मीराबाई उमप ठरली जिल्ह्यात अव्वल

बहादरपूरच्या श्रीशा आहेर हिने साकारलेली मीराबाई उमप ठरली जिल्ह्यात अव्वल
कोपरगाव । प्रतिनिधी ।
रेसिडेन्शिअल हायस्कूल अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर,केंद्र -पोहेगाव ,ता. कोपरगाव येथील श्रीशा शरद आहेर या विद्यार्थिनीने किशोर गटातून शाहीर मीराबाई उमप यांची प्रभावीपणे साकारलेली वेशभूषेनुसार भूमिका जिल्हास्तरावर अव्वल ठरली. श्रीशा हीने सतत दोन वर्ष तालुकास्तरावर प्राविण्य मिळवले होते. जिल्हास्तरासाठी पात्र ठरली नाही म्हणून अपयशाने खचून न जाता आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर यावेळी तिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत स्वतःला सिद्ध केले. याच शाळेतील कल्याणी शिवाजी रहाणे, प्रियंका विठ्ठल रहाणे, सोहम पोपट कुडके या विद्यार्थ्यांनीही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरासाठी कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
या यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब,गटविकास अधिकारी संदीप दळवी साहेब, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, विस्तार अधिकारी श्रीमती पुजारी, केंद्रप्रमुख भारती शेळके, मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.श्रीशाच्या यशासाठी वर्गशिक्षक रामदास गव्हाणे तसेच मुरलीधर वाकचौरे, गणेश पाचोरे,शरद आहेर ,स्वाती मसुते, सारिका गावित,धनश्री भिवसन यांचे मार्गदर्शन लाभले.