ब्रेकिंग

थोरात कारखान्याच्या कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

थोरात कारखान्याच्या कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

संगमनेर । प्रतिनिधी ।  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर यशस्वी वाटचाल करताना थोरात सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. उच्चांकी भाव देताना कायम शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले असून दिवाळीनिमित्त  दरवर्षीप्रमाणे कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान  मिळणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, मा चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले,लक्ष्मणराव कुटे ,संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, संचालक संतोष हासे,संपतराव गोडगे, इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे ,गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजणे, दिलीप नागरे ,सौ लताताई गायकर, सौ सुंदरबाई दुबे ,बंडू नाना भाबड, मदन आंबरे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,सेक्रेटरी किरण कानवडे आणि उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की कारखान्याने कायम सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत गौरवास्पद वाटचाल केली आहे.   सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून दरवर्षीप्रमाणे कारखान्याकडून कामगारांसाठी 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची अनेक मुले उच्च पदावर काम करत असून देश विदेशात कार्यरत आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. कर्मचाऱ्यांचे यामध्ये मोठे सहकार्य राहिले असल्याचे ते म्हणाले.सहकारी साखर कारखाना मधील कर्मचाऱ्यांना वेळेत पगारासह सर्वाधिक सुविधा देणाऱ्या थोरात कारखान्याने कायम सर्वाधिक बोनस व सानुग्रह अनुदान दिले आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ऊस उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असून त्यामुळे संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे 100 कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होत असते यावर्षीही दिवाळी होणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले यावेळी सभासद शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्थिरतेमुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला दिलासा

 मागील एक वर्षापासून संगमनेर मध्ये असतील त्याचे व सुरक्षित वातावरण आहे त्यामुळे बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाला. दिवाळी जवळ आली तरी बाजारपेठ भरली नाही यामुळे व्यापारी चिंतेत होते. मात्र दरवर्षीप्रमाणे कारखान्याने 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान तसेच शेतकऱ्यांसाठी प्रति टन दोनशे रुपये जाहीर केले आहे. याचबरोबर राजहंस दूध संघ व इतर सहकारी संस्था यांच्यामुळे बाजारपेठेत शेकडो रुपयांची उलाढाल होणार असून व्यापाऱ्यांना अमृत उद्योग समूह व सहकारी संस्थांमुळे दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!