आरंभ बालक पालक मेळावा ब्राह्मणगाव मधे उत्साहात साजरा
आरंभ बालक पालक मेळावा ब्राह्मणगाव मधे उत्साहात साजरा
आरंभ बालक पालक मेळावा ब्राह्मणगाव मधे उत्साहात साजरा
कोपरगांव । प्रतिनिधी ।
० ते सहा वयोगातील बालक पालक मेळावा ब्राह्मणगाव येथे अतिशय उत्साहात पार पडला
एकात्मिक बाल विकास सेवा योजना येसगाव गटाच्या वतीने येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या वतीने ह्या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी ब्राह्मणगाव चे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ रूपाली धुमाळ मॅडम यांची प्रमुख उपस्तिती लाभली होती
यावेळी मा गीता देवगुणे मॅडम पर्यवेशिका येसगाव गट ,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना संचालक श्री श्रावण आसने ,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंगाडे ,ग्रामपंचायत सदस्य देविदास आसने ,माजी सरपंच बाळासाहेब आहेर ,माजी सरपंच शोभाताई बनकर ,तंटा मुक्ती अध्यक्ष नानासाहेब जाधव ,शाळेय समिती मा अध्यक्ष बाबासाहेब जगताप ,नानासाहेब सोनवणे ,अक्षय येवले आदी मान्यवर मान्यवर व येसगाव गटातील सर्व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच मोठ्या संखेने बालक व त्यांचे पालक उपस्थीत होते

सरपंच अनुराग येवले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले
त्यानंतर सर्व मान्यवरांनी राजमाता जिजाऊ आणि शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .प्रारंभी देवगुणे मॅडम यांनी प्रास्थाविक केले त्यानंतर रुपाली धुमाळ मॅडम व सरपंच अनुराग भाऊ येवले यांनी मार्गदर्शनपर भाषण केले .
० ते ६ वयोगटातील बालकांच्या बुद्धी व शरीरच्या वाढीसाठी तसेच आई च्या स्वस्थ साठीकाय गरजेचे आहे ,मुलांचा मोबाईल वापर टाळणे ,त्यांचे खेळ ,शिक्षण ,आरोग्य ,संगोपन आदि विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले
ब्राह्मणगाव येथील अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच येसगाव गटातील सर्व अंगणवाडी स्टाफ ने या कार्यक्रमासाठी खूप परिश्रण घेतले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला..उपस्तीत मान्यवर व पालक यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले