सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात दि.28 जानेवारी रोजी नोकरी मेळाव्याचेआयोजन

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात दि.28 जानेवारी रोजी नोकरी मेळाव्याचेआयोजन
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात दि.28 जानेवारी रोजी नोकरी मेळाव्याचेआयोजन
संगमनेर । प्रतिनिधी ।
थोरात महाविद्यालयात रोजगार व प्रशिक्षण केंद्र व रिलायन्स फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कि, पुणे परिसरातील नामवंत 10 कंपन्या या नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये बी.ए.,बीकॉम.,बी. बी. ए. एम. बी. ए. एम. कॉम. एम.ए.,एम.एस्सी, बी.एस्सी,आय.टी,संगणकशास्त्र, व्यवस्थापन हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या सुवर्णंसंधी उपलब्ध होणारआहेत. तरी या यासंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुधीरतांबे, पदवीधरआमदारसत्यजिततांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, उपप्राचार्यडॉ. विलासकोल्हे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट,रोजगार व प्रशिक्षण केंद्र समन्वयक गणेश थोरात यांनीकेलेआहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेलीआहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठिक11.00 वा.के. बी. दादा देशमुख सभागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.