ब्रेकिंग

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार – नितिनराव औताडे

पोहेगांव खडकी नदीवरील पुलाच्या कामात सुरुवात परिसरातील 25 गावांचा दळणवळण सुखर होणार

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार – नितिनराव औताडे

माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार – नितिनराव औताडे

पोहेगांव खडकी नदीवरील पुलाच्या कामात सुरुवात
परिसरातील 25 गावांचा दळणवळण सुखर होणार

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बाजारपेठेला बळकटी मिळण्यासाठी तसेच राहता व कोपरगाव तालुक्यातील चासनळी पासून कोळपेवाडी देर्डे ,मढी या परिसराचा राहाता प्रवरानगर लोणी या भागाशी दळणवळण सोयीस्कर होण्यासाठी पोहेगाव खडकी नदीवरील पुलाचा उपयोग होणार आहे.


हा खडकी नाल्यावरील पुल तब्बल 60 ते 70 वर्षाचा असल्याने हा जीर्ण झालेला होता. पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे तो पूर्ण वाहून गेला होता. तेव्हा तालुक्यातील उत्तरे कडील गावांचा दक्षिणेतील पोहेगाव राहता प्रवारानगर या गावच्या नागरिकांचा नजीकच्या संपर्क तुटला होता.देर्डे कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, मढी बुद्रुक ,मढी खुर्द येथील नागरिकांना पोहेगाव बाजारपेठेमध्ये येण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. दूध उत्पादकांना दूध आणण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांना पोहेगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मोठी अडचण व गैरसोय झाली होती. पोहेगाव परिसरातील नागरिकांचा कोळपेवाडी कारखान्याची संपर्ककरायचा म्हटलं की दूरचा मार्ग निवडावा लागत होता. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यास ऊस पुरवठा करताना ऊस वाहतुकीचा ही प्रश्न निर्माण झाला होता.

जाहिरात

तेव्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अमोल औताडे यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा वाहतुकीचा प्रश्न सोडवला होता. मात्र कायमस्वरूपी दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी तत्कालीन खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून डोऱ्हाळे ते कुंभारी या 11 किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर करून घेतला
त्याचप्रमाणे याच रस्त्यावरील खडकी नाला पुलाचे कामही होण्यासाठी नितीनराव औताडे यांनी तत्कालीन खासदार लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा करून पुलासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून 1 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.
या पुलाचे काम नुकतेच सुरू झाले असून तीन ते चार महिन्यात सदरचा पूल दळणवळणासाठी तयार होईल. या पुलासाठी निधी मंजूर करण्याचे काम तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांनीच केले आहे. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीच करू नये असेही औताडे यांनी म्हटले आहे. या पुलाचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपसरपंच अमोल औताडे, ग्रामविकास अधिकारी टिळेकर सुरू असलेल्या कामावर भेट देत या कामाची पाहणी केली. व या पुलाचे काम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी
संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!