अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात ‘वर्चस्व २.० (2k25) या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा संपन्न


संगमनेर। प्रतिनिधी । महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात सालाबाद प्रमाणे ‘वर्चस्व २.० (2k25) या शीर्षकाअंतर्गत राज्यस्तरीय पदवी महाविद्यालयांसाठी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. या राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गुरुवार दिनांक २३ व २४ जानेवारी २०२५ या दोन दिवसात आयोजित केल्या होत्या. या आंतरमहाविद्यालय स्पर्धाचे उदघाट्न अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक व्ही बी. धुमाळ आणि अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे बी गुरव यांच्या शुभहस्ते झाले. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी. एम. लोंढे यांनी दिली.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. शरयू देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत विविध कार्यक्षेत्रांमध्ये उत्कृष्टता साधण्याचे आवाहन केले. तसेच, या प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, ‘वर्चस्व २.० स्पर्धेच्या आयोजनाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाला नवे रंग दिले आहेत आणि विद्यार्थ्यांना एक सकारात्मक दिशा दाखवली आहे.” अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांना एक सकारात्मक वातावरणात आपली क्षमता प्रदर्शित करण्याची संधी देतात आणि त्यांना आगामी जीवनात अधिक चांगली दिशा देतात. असे त्या म्हणाल्या.

या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये राज्यातील विविध पदवी महाविद्यालयातील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपली कौशल्य दाखविली विद्यार्थ्याच्या प्रेरणा विचारशक्ती आणि टीमवर्क महत्व अधोरेखित करणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय चुरस पूर्ण व चांगली स्पर्धा दाखवली.

या राज्यस्तरीय पदवी व पदविका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये बिजनेस क्विज स्पर्धा. फेस पेंटिंग, रील मेकिंग आणि क्रिकेट या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या विविध राऊंड्समध्ये घेण्यात आल्या आणि प्रत्येक राऊंड्स मध्ये विद्यार्थ्यांना आपली स्वतःची क्षमता आणि कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली.स्पर्धेचा समारोप एका सन्माननीय कार्यक्रमात झाला. ज्यामध्ये विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि रोख रक्कम प्रथम पारितोषिक रु. ५०००, तृतीय पारितोषिक रु. ३००० आणि तृतीय पारितोषिक रु. २००० याप्रमाणे स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.या राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये बिजनेस क्विज मध्ये प्रथम पारितोषिक श्रद्धा किशोर तोरमल संगमनेर कॉलेज तर द्वितीय पारितोषिक साक्षी अनिल सांगळे अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि तृतीय बक्षीस सार्थक बाळासाहेब भोर अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी या विद्यार्थ्यांना देण्यात आले.या स्पर्धेची संपूर्ण तयारी आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी .एम. लोंढे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन केल्याबद्दल माजी महसूल मंत्री वाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू देशमुख, संचालक इंद्रजीत थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक व्ही वी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव या सर्वानी एमबीए महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले.