ब्रेकिंग

मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचे पर्व- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

टेक्निकल प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी

जाहिरात
मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचे पर्व- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचे पर्व- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर  । प्रतिनिधी ।अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध शाखांनी गुणवत्तेमुळे देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. या संस्थेतील अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशात विविध पदांवर कार्यरत असून या सर्वांचा संस्थेला नेहमी अभिमान आहे .कर्तुत्वान युवक घडवण्याचे काम अमृतवाहिनीच्या माध्यमातून होत असून अभ्यासाबरोबरच अमृतवाहिनीतील मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचे पर्व ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतकलामंच येथे  मेधा महोत्सवाअंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर विश्वस्त मा. आ. डॉ सुधीर तांबे, लेखक शरद तांदळे,कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ एम.ए. वेंकटेश उपस्थित होते.

याप्रसंगी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध शाखांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मेधा महोत्सवातील पेंटिंग, ड्रामा, गायन, वादन, संशोधन ,प्रोजेक्ट, पेपर प्रेझेंटेशन, विविध क्रीडा स्पर्धा यामधील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.यावेळी माजीमंत्री थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या अमृतवाहिनी संस्थेने आता देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. चांगल्या गुणवत्तेबरोबर चांगला नागरिक घडवण्यासाठी संस्थेमधून काम होत आहे. येणारे युग हे एआय चे असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे .तंत्रज्ञानाची मोठी संधी तुम्हाला हातामध्ये आली आहे.वाचन, चिंतन, मनन आणि संशोधन वृत्ती ही तुम्हाला यश मिळवून देणार असून विद्यार्थीदशेमध्ये चांगल्या क्षणांमधील मेधा महोत्सव हा जीवनातील आनंदाचे पर्व ठरणार असल्याचे ते म्हणाले तर मा. आ. डॉ तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हे गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र ठरले आहे .दररोज नवी आव्हाने आहेत तसे नवीन संशोधन होत आहे .आणि याकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने पाहिले तर त्यातून नवी संधी प्रत्येकाला मिळणार असल्याचे ते म्हणाले.सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत केजी टू पीजी शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. संशोधनास मोठा वाव असून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचा विविध राष्ट्रीय कंपन्या यांच्याशी झालेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी मिळत असल्याचे ही त्या म्हणाल्या.यावेळी प्राचार्य प्रा व्ही.बी धुमाळ डॉ.जे बी गुरव, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, विलास भाटे, डॉ राजेंद्र वाघ ,सौ जे. बी सेठी, शितल गायकवाड ,अंजली कन्नावार, प्रा जी.बी काळे, डॉ विलास शिंदे ,नामदेव गायकवाड, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते.यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, बी फार्मसी, डी फार्मसी, एम बी ए, आय टी आय ,मॉडेल स्कूल, जुनियर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, एग्रीकल्चर कॉलेज, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल या सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेक्निकल प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी

विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला व मिळावा याकरता अमृतवाहिनी मधील विविध विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीने आयोजित भव्य टेक्निकल प्रदर्शन पाहण्यासाठी अमृतवाहिनी मधील विविध विद्यार्थ्यांसह संगमनेर मधील काही विद्यालयांमधील विद्यार्थी पालक उद्योजक नागरीक यांनी मोठी उपस्थिती दाखवली आहे. कृषी उपयुक्त नवीन यंत्रे, औषधे, सौर पंप, विविध मॉडेल्स, ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवीन वाहने हे विशेष आकर्षण ठरले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!