ब्रेकिंग

मेधा महोत्सवात 32 महाविद्यालयाचे धमाकेदार सादरीकरण

सोळा जिल्ह्यांमधील 32 महाविद्यालयांचा समावेश

जाहिरात
मेधा महोत्सवात 32 महाविद्यालयाचे धमाकेदार सादरीकरण

मेधा महोत्सवात 32 महाविद्यालयाचे धमाकेदार सादरीकरण
सोळा जिल्ह्यांमधील 32 महाविद्यालयांचा समावेश

संगमनेर । प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवात राज्यभरातील 16 जिल्ह्यांमधील 32 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आणि दर्जेदार झालेले कार्यक्रम यामुळे हा मेधा महोत्सव संस्मरणीय ठरला.मेघा मैदानावर झालेल्या मेधा कपमध्ये जिल्हा 16 जिल्ह्यांमधील 32 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यावेळी आध्यात्मिक आणि पारंपारिक कलेवर झालेल्या विविध सादरीकरणप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, प्रा. व्ही बी धुमाळ, डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ मनोज शिरभाते , डॉ राजेंद्र वाघ, विलास भाटे, सौ.जे बी सेठी ,श्रीमती शीतल गायकवाड, अंजली कन्नावार, डॉ विलास शिंदे , प्रा.अशोक वाळे , प्रा.अशोक मरकड, विजय वाघे, नामदेव गायकवाड आदी सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते.

अमृतवाहिनी मेधा कप मध्ये, अहमदनगर ,नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार ,पुणे,छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड ठाणे यांसह 16 जिल्ह्यातील 32 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर जुन्नरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तांडवपंथी रोमहर्षक ठरला. आळेफाटा येथील समर्थ ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्याने धमाल केली .तर अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांची लल्लाटी भंडार या गीताने सर्वांना नाचायला लावले .अहमदनगरच्या विद्यार्थ्यांचा जोगवा आणि पुणे येथील विद्यार्थ्यांची कृष्ण लीला अंगावर शहारे आणणारी होती.

धुळे येथील विद्यार्थ्यांचा कालिया मर्दन नाशिक येथील विद्यार्थ्यांचा वीर तानाजी आकुर्डी पुणे येथील विद्यार्थ्यांचे रुद्र कृष्णा या गीतानंतर इस्लामपूर सांगलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले तांडव नृत्याने अंगावर शहारी आणले. छत्रपती संभाजी नगरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्ण लीलातून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले .तर अमृतवाहिनी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवतांडव आणि महाभारताने अंगावर शहारे उभे केले.32 महाविद्यालयातील 426 विद्यार्थ्यांनी या मेधा महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत आपली कला सादर केली सहासी नृत्य, वेशभूषा, लाईट व्यवस्था, आणि दर्जेदार सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.याप्रसंगी शुभेच्छा देताना सौ. शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले असून अमृतवाहिनी मेधा महोत्सव हा उत्तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे. यापुढील काळातही सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतील असे त्या म्हणाल्या. यावेळी सौ कांचनताई थोरात म्हणाल्या की ज्यांनी आयुष्य तुमच्यासाठी झिजवले त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. अभ्यास करून जीवनात मोठे यश मिळवा अशा शुभेच्छा त्यांनी सर्वांना दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्राचार्य व मुख्य समन्वयक डॉ एम.ए व्यंकटेश यांनी सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पॉलीटेक्निक एमबीए बी फार्मसी डी फार्मसी आयटीआय मॉडेल स्कूल ज्युनिअर कॉलेज इंटरनॅशनल स्कूल एग्रीकल्चर कॉलेज इंटरनॅशनल स्कूल या विविध महाविद्यालयातील सुमारे दहा हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

जाहिरात

अमृतवाहिनी फार्मसी मेधा कपचा विजेता

32 संघांचा सहभाग असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात अमृतवाहिनी बी फार्मसी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह पटकावले तर द्वितीय क्रमांक समर्थ महाविद्यालय बेल्हे यांनी मिळवले 31 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह मिळवले तर पंडित नेहरू विद्यालय जुन्नर यांनी तृतीय क्रमांकाचे 21 हजार रुपये व सन्मान चिन्ह सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!