ब्रेकिंग
लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत- साहित्यिक कळमकर
सह्याद्री संस्थेत आजी-माजी सेवक व पालकांचा संवाद मेळावा संपन्न
लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत- साहित्यिक कळमकर

लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत- साहित्यिक कळमकर
सह्याद्री संस्थेत आजी-माजी सेवक व पालकांचा संवाद मेळावा संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवदगार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी-माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे,लहानु भाऊ पा. गुंजाळ, डॉ.सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे ,नानासाहेब गुंजाळ, सिताराम वरपे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी बोलताना साहित्यिक कळमकर म्हणाले की, जनतेसाठी जीवन समर्पित करणारे नेते हे जनतेच्या हृदयात असतात. अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कर्तुत्वाने राज्यात तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव पोहोचविले. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडताना त्या खात्यांना लोकाभिमुख बनवले. संगमनेर तालुका हा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विकसित बनवला. निवडणुकीचे पराजय होत असतात परंतु समाजासाठी झटणारे लोकनेते हे जनतेच्या हृदयात असतात.





