ब्रेकिंग

थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ – प्राचार्य डॉ.वाघ

आनंद मेळाव्यात विविध उपक्रमांचा शुभारंभ

जाहिरात
थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ – प्राचार्य डॉ.वाघ

थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ – प्राचार्य डॉ.वाघ

वार्षिक स्नेहसंमेलन हे सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ – प्रा.नामदेव कहांडळ

आनंद मेळाव्यात विविध उपक्रमांचा शुभारंभ

संगमनेर ( प्रतिनिधी ) परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. सध्या स्पर्धेच्या युगात आपल्या शिक्षणाबरोबर माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक असून या सर्व सुविधा देणारे सह्याद्री संस्थेचे थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमृत उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ,उपप्राचार्य डॉ.विलास कोल्हे, डॉ.लक्ष्मण घायवट, प्रा. जयराम डेरे, डॉ.मिलिंद सकळकळे,डॉ.विजय बैरागी, डॉ.त्रिंबक राजदेव, प्रा. दिनकर पवार, प्रा.प्रभाकर गायकवाड, प्रा.गणेश थोरात, प्रा.आबासाहेब पोकळे,प्रा.संदीप कुदनर,प्रा महेश गुंजाळ, प्रा.महेश हजारे,गोरक्षनाथ पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी व अमृत उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले. यामध्ये साडी व ट्राय डे, मेहंदी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, फनी गेम्स, पाककला स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उद्घाटन, शेलापागोटे अशा उपक्रमांचा समावेश आहे.

यावेळी डॉ.वाघ म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरता विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचे काम थोरात महाविद्यालयातून होत आहे. वार्षिक स्नेह संमेलनातील विविध उपक्रमामुळे विशेषतः खाद्य स्टॉल मधून अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ आणि त्याची विक्री यामुळे या विद्यार्थ्यांना व्यापाराबाबतचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार आहे.तर नामदेव कहांडळ म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री महाविद्यालयाने गुणवत्तेतून आपला लोकिक निर्माण केला आहे. अनेक माजी विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असून हे विद्यार्थी या संस्थेचे मोठे भांडवल आहे. विद्यार्थी दसेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन हे आनंदाचे पर्व असते. विविध उपक्रमामुळे सह्याद्री महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ ठरणार आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन याबाबतची माहिती घेतली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.मिलिंद सकळकळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रॅडिशनल डे ठरले मुख्य आकर्षक

पारंपारिक वेशभूषेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी हे मुख्य आकर्षण ठरले. अनेकांनी महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन दाखवत भारतामधील विविध प्रांत वार असलेल्या वेशभूषा परिधान केल्याने पंजाबी, राजस्थानी, गुजराती, आदिवासी, महाराष्ट्रीयन ,दक्षिणात्य वेशभूषी मधले विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!