ब्रेकिंग
साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून फरक द्या – आमदार बाळासाहेब थोरात
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची आ. थोरात यांची विधानसभेत मागणी
साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून फरक द्या – आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।
अध्यात्मिक दृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व व जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना वेतनातील फरक द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवस प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आमदार थोरात यांनी वाचा फोडली आहे.

मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मागणी करताना आमदार थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी कर्मचारी साधारणपणे 20 -22 वर्षापासून सेवेत आहे. मागील काळात आपण 1052 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले. मात्र हे 598 कर्मचारी त्या नियमांपासून वंचित राहून अजूनही कंत्राटी पद्धतीने काम करत आहे.

या कर्मचाऱ्यांबरोबरच्या इतर कर्मचाऱ्यांना महिन्याला साधारण 40 हजार रुपये पगार मिळतो. तर कंत्राटदाराकडून संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये पगार मिळतो. मात्र संस्थांकडून सेवेत घेऊन ही या कर्मचाऱ्यांना फक्त दहा हजार रुपये पगार मिळतो .यामुळे या कर्मचाऱ्यांना घर खर्च चालवणे, आजारपण, मुलांचे शिक्षण करणे जिकरीचे होऊन बसले आहे. अनेक वर्षांपासून हे कंत्राटी कर्मचारी कमी वेतनात काम करत असून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर हा एक प्रकारे मोठा अन्यायच आहे.

या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे बाबत अनेक वेळा प्रस्तावही दाखल झाले आहेत. तरी या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांना न्याय भूमिका दिली पाहिजे. या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा. याबाबत न्यायालयीन काही अडचणी आल्यास आपण निर्णय घेऊन मा. उच्च न्यायालय यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवावे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी साई संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवस प्रलंबित असलेल्या प्रश्नांना थेट विधानसभेत वाचा फोडली असून यामुळे साई संस्थान मधील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे