ब्रेकिंग

प्रेमात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाला आई व प्रियकराने संपवले

कोपरगाव तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या दोन मारेकऱ्यांना केले जेरबंद

जाहिरात
प्रेमात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाला आई व प्रियकराने संपवले

प्रेमात अडसर नको म्हणून पोटच्या मुलाला आई व प्रियकराने संपवले

कोपरगाव तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या दोन मारेकऱ्यांना केले जेरबंद

कोपरगाव । प्रतिनिधी ।

कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरातुन वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यात सव्वा चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती त्या मृतदेहावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करत प्राप्त अहवालातनुसार त्या चिमुकल्याचा मृत्यु डोक्याला जबर मार लागल्याने झाल्याचे समजले असता कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला.


पोलिस निरीक्षक कोळी यांनी पोलिसांची पथके नेमून आस पास चा सर्व परिसर पिंजून काढत सी.सी.टी. व्ही ची मदत घेत तसेच गुप्त बातमी दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार प्रेम संबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने त्या चिमुकल्याची हत्या त्याचाच आईने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून केल्याची पोलिसांच्या तपासात उघड झाल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या दोन मारेकऱ्यांना नुकतेच जेरबंद केले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.अधिक माहिती अशी की, मृत बालकाची आई शितल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांचे प्रेम संबंध होते त्या दोघांच्या अनैतिक संबंधात तिचा मुलगा कार्तीक ज्ञानेश्वर बदादे वय ४ वर्षे ३ महिने रा. साकुरेमिंग ता निफाड जि नाशिक हा आड येत असल्याने त्या दोघांनी मिळून त्या निष्पाप जीवाचा निर्दयपणे मारून टाकत २० डिसेंबर २०२४ रोजी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांत गुंडाळून, हातपाय बांधून कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात फेकून दिल्याची घटना समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती तर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील कोपरगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या पोलिस पथकाची वेगवेगळी पथके तयार करुन चहूबाजूने आरोपींचा शोध घेणें कामी अहोरात्र तपास सुरू केला.

जाहिरात

शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी यातील महिला आरोपी शितल ज्ञानेश्वर बदादे ही दिंडोरी येथे आली असल्याची माहिती ग्रामिण पोलिसांना त्यांचा गुप्त बातमीदारा मार्फत समजताच पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तपास करुन तिचा शोध घेतला असता ती मिळून आल्याने तीला ताब्यात घेऊन तिचा कडे तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ याचे ठावठिकाण्याबावत अधिकची माहिती घेतली असता तीने तो भऊर ता. देवळा जि. नाशिक येथे असल्याचे सांगताच ग्रामीण पोलिस पथकाने लागलीच सदर भागात जाऊन मोठ्या शिताफीने रात्रभर साफळा रचत रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी तो मिळून आला असता पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन प्रेमात अडसर नको म्हणून सदर मुलाचा खुन केला असल्याचे सांगितले.सदरची कौतुकास्पद कामगिरी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कल्लुबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, कमलाकर चौधरी, पोहेकॉ संदीप बोटे, पोहेकॉ मधुसूदन दहिफळे, पोकॉ नवनाथ गुंजाळ, पोकॉ रमेश झडे, पोकॉ राजु शेख, पोकॉ प्रकाश नवाळी, पोकॉ युवराज खुळे, पोकॉ किसन सानप तसेच अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचे कार्यालयातील पोकॉ सचिन धनाड यांच्या पोलिस पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!