भगवान विश्वकर्मानी विश्वाची निर्मिती केली – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे
पोहेगांव येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

भगवान विश्वकर्मानी विश्वाची निर्मिती केली – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे
भगवान विश्वकर्मानी विश्वाची निर्मिती केली – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे
पोहेगांव येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव । प्रतिनिधी । ब्रह्मदेवाने विश्वकर्मांकडून विश्वाची निर्मिती करून घेतली. भगवान विश्वकर्मा हे उत्तम नियोजक होते. भगवान कृष्णाची राजधानी द्वारका, महाभारतातील कौरवांची राजधानी हस्तिनापुर शहर, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, तसेच देवांच्या शस्त्रांची देखील निर्मिती विश्वकर्मांनी केली. देशातील सर्वच कारागीर विश्वकर्मांचेच अवतार आहेत. बारा बलुतेदार समाजातील कारागिरांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून कारागिरांना एक लाखाच्या वरती आर्थिक सहाय्य केले जाते.अवघ्या विश्वाची निर्मिती भगवान विश्वकर्मांनी केली. त्याचप्रमाणे दर्जेदार उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारच्या कारागिरांना सरकार प्रोत्साहन देत आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे विश्वकर्मा जयंती सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी उपसरपंच अमोल औताडे, प्रकाशराव रोहमारे, दिलीप वाके ,नामदेव शिरसाठ ,संजय विघे ,साहेबराव विघे ,नवनाथ लोखंडे , अशोक विघे, किशोर विघे,दादासाहेब वीघे ,कानिफनाथ विघे ,सुनील विघे ,निलेश विघे,अशोक विघे,
भैरवनाथ विघे ,बाळासाहेब विघे,शालिग्राम पोपळघट, अक्षय विघे ,अशोक कौशे, संदीप विघे, मनोहर विघे ,रमेश विघे, गौरव विघे, रविंद्र विघे, गोविंद विघे,अविराज विघे अदी सह वीस गावातील लोहार सुतार शिंपी बारा बलुतेदार समाजातील कारागीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपसरपंच अमोल औताडे यांनी उपस्थितांना त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक विघे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी आर एस टिळेकर यांनी मानले.