ब्रेकिंग

संगमनेरमध्ये रविवार 16 फेब्रुवारी रोजी भव्य नोकरी महोत्सव

I love Sangamner या लोकचळवळच्या माध्यमातून संगमनेर शहरात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन!

संगमनेरमध्ये रविवार 16 फेब्रुवारी रोजी भव्य नोकरी महोत्सव

संगमनेरमध्ये रविवार 16 फेब्रुवारी रोजी भव्य नोकरी महोत्सव
I love Sangamner या लोकचळवळच्या माध्यमातून संगमनेर शहरात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन!
संगमनेर । प्रतिनिधी । आय लव संगमनेर ही लोकचळवळ आरोग्य, कृषी, सांस्कृतिक अशा विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असून आता एक महत्त्वपूर्ण नोकरी महोत्सवाच्या आयोजनाने नवीन पर्व सुरू करत आहे. ‘युथोत्सव’ या नावाने ओळखला जाणारा हा भव्य नोकरी महोत्सव रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सह्याद्री कॉलेज, संगमनेर येथे सकाळी ८ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा.आ.डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात व सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. युथोत्सव या अंतर्गत या नोकरी मेळाव्यात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, नॉन-आयटी, बँकिंग, फायनान्स, हॉस्पिटिलिटी, फार्मा, ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच, जापनीज फुकुकु कंपनी, GKN, टाटा, महिंद्रा, बजाज, ॲक्सिस बँक, HDFC बँक, फ्युजन फायनान्स, JCB इंडिया, आदित्य बिर्ला ग्रुप यासारख्या प्रचंड प्रतिष्ठित कंपन्या उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे विविध उद्योग क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी हे महोत्सव एक सुवर्ण संधी ठरणार आहे.आय लव संगमनेर ही लोकचळवळ आरोग्य, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध  क्षेत्रात कार्यरत आहे. या नोकरी महोत्सवामुळे या क्षेत्रातही  लोकांना नवीन संधी मिळवून देण्याचा उद्देश आहे. सर्व युवक व  इच्छुक उमेदवारांनी ilovesangamner.org या लिंकवर जाऊन आपला फॉर्म भरावा व काही अडचण आल्यास welovesangamner@gmail.com या मेल आयडी ला संपर्क करावा असे आवाहन  आय लव संगमनेर या लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!