ब्रेकिंग
शहापुर येथे भीषण अपघात…पती-पत्नी जागीच ठार
अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार आहे.

शहापुर येथे भीषण अपघात…पती-पत्नी जागीच ठार

शहापुर येथे भीषण अपघात…पती-पत्नी जागीच ठार
अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार आहे.
कोपरगांव । प्रतिनिधी ।
कोपरगांव – संगमनेर रस्त्यावर शहापूर शिवारात ट्रक व मोटरसायकलचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागेवरच ठार झाले आहेत.ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एच.आर.७४ बी ६२१८ याने मोटरसायकल क्रमांक एम.एच १५ इ.वाय.८०९८ यास पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत मोटरसायकल वरील सर्जेराव शांताराम सोनवणे(वय-४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय-३५) रा वेल्हाळे तालुका संगमनेर हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार झाले

सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले तर त्यांच्या पत्नी रुपाली सोनवणे यांच्या अंगावरूनही ट्रक गेली. याबाबत शहापूरचे पोलीस पाटील खंडीझोड यांनी शिर्डी पोलीसांना कळविले.पोलीसांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला.ट्रकचालक घटना घडल्यानंतर पळुन चालला होता मात्र स्थानिकांनी त्यास पकडले. हा रस्ता अतिशय खराब आहे.खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात.अजुन किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबधित विभाग करणार आहे.



