राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असावे – बाळासाहेब थोरात

राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असावे – बाळासाहेब थोरात
जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न

अमृतवाहिनी बँकेमध्ये अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची सहविचार बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, सौ प्रभावती ताई घोगरे, मधुकरराव नवले, डॉ. जयश्रीताई थोरात,संपतराव म्हस्के, डॉ एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्ञानदेव वाफारे, हिरालाल पगडाल, प्रतापराव शेळके, अमृत गायके,सचिन चौगुले ,शिवाजी नेहे,बाबासाहेब दिघे, विश्वास मुर्तडक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी विचारांची, त्यागाची आणि बलिदानाची परंपरा आहे. लोकशाहीमध्ये जय- पराजय होत असतात. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले मात्र अवघ्या चारच महिन्यात इतका बदल कसा होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. ईव्हीएम बाबतही संपूर्ण देशात मोठी शंका आहे. याबाबत निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही.सत्ताधाऱ्यांनी टोकाचे धर्माचे राजकारण केले. विखारी प्रचार केला. सोशल मीडियाचा चुकीचा वापर केला. त्यातून त्यांनी यश मिळवले. हे सर्व जरी असले तरी जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पुन्हा मैदानात आहे. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या विकासासाठी करायचे असते. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस व लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने हर हर महादेव म्हणून पुन्हा मैदानात उतरले पाहिजे.येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुका असून नव्या उमेदीने सर्वांना सोबत घेऊन सर्वांनी शेतकरी सर्वसामान्य यांच्या प्रश्नावर काम करावे असे आवाहन त्यांनी केले.तर सौ प्रभावती घोगरे म्हणाल्या की, विधानसभेमध्ये सत्तेच्या गैरवापरातून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय खोटा आहे. तर घनश्याम शेलार म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले की काँग्रेसचे मोठी परंपरा असून अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा राहिला आहे. यापुढील काळातही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अधिक जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी मधुकरराव नवले प्राचार्य हिरालाल पगडाल ,सचिन गुजर, सौ लताताई डांगे, बनसोडे, यांनीही मनोगत व्यक्त केले. या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी एकनाथ गोंदकर,पंकज लोंढे, बाळासाहेब नाईकवाडी आदी उपस्थित होते.
लोकशाही वाचवण्यासाठी हर हर महादेवकाँग्रेसचा विचार हा सर्वसामान्यांचा विचार आहे सर्वधर्मसमभावाचा विचार आहे देशातील सर्वांना समानता व अधिकार देणारी लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पुन्हा मैदानात उतरली असून हर हर महादेव म्हणून प्रत्येक नागरिकांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.तर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबतही कार्यकर्त्यांनी आढावा घेतला.