जवळकेची सृष्टी थोरात विद्यापीठ आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
जवळकेची सृष्टी थोरात विद्यापीठ आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवाशी व सध्या भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले गोरक्षनाथ जयराम थोरात व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका इंदिरा थोरात यांची कन्या सृष्टी थोरात नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाची परीक्षा ९९.६७ पर्सेंटाइल ने उत्तीर्ण झाली आहे.
सृष्टीचे दहावीपर्यंतचे शिक्षण अमृतवाहीणी मॉडेल स्कूल संगमनेर या शाळेत तर बारावीपर्यंतचे व त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील गरवारे महाविद्यालयात झाले असून सध्या सृष्टी जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.सृष्टीच्या या यशाबद्दल भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील, प्रा शिवाजी नवले आदि सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच जवळके गावचे माजी सरपंच रावसाहेब थोरात, संजय थोरात, अक्षय थोरात, भाऊसाहेब थोरात आदींनी अभिनंदन करत सृष्टीस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.