ब्रेकिंग

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम तर नाशिक विभागात द्वितीय

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम तर नाशिक विभागात द्वितीय
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम तर नाशिक विभागात द्वितीय
संगमनेर । प्रतिनिधी ।  माजी कृषी व महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या वतीने स्मार्ट प्रकल्पांतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळाला असल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.

जाहिरात

महाराष्ट्र सरकारच्या पणन विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रमाणित केली आहे. यामध्ये प्रपत्र व सहाय्यक निबंधक यांनी तपासणी करून निकषानुसार गुणांकन केले आहे. यामध्ये 2023 – 24 साठी महाराष्ट्र राज्यातून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. लोकनेते माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी,व्यापारी या सर्वांना अत्यंत अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत.  संगणकीय कामकाज, उपबाजार समित्यांचे कामकाज, स्वच्छता, कामकाजावरील विश्वास अशा सर्व सुविधा या सर्व निकषांमध्ये संगमनेर बाजार समिती ही आगमनांकित आहे. सलग दुसऱ्या वर्षी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला हा प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या वाटचालीत सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, सुरेश कान्होरे,सतीश खताळ, मनीष गोपाळे, अरुण वाघ,विजय सातपुते, सुधाकर ताजणे, सखाराम शेरमाळे, अनिल घुगे, निलेश कडलग,संजय खरात, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे,सौ.दिपाली वरपे, सौ. रुक्मिणी साकुरे, सचिव सतीश गुंजाळ आदींनी सातत्यपूर्ण काम केले आहे.बाजार समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात,संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, बाजीराव पा.खेमनर, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!