स्व.भाऊसाहेब थोरात यांचा संघर्षाचा वारसा पुढे सुरूच ठेवणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
जोर्वे येथे थोरात कारखान्याच्या वतीने स्नेह मेळावा संपन्न

स्व.भाऊसाहेब थोरात यांचा संघर्षाचा वारसा पुढे सुरूच ठेवणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

स्व.भाऊसाहेब थोरात यांचा संघर्षाचा वारसा पुढे सुरूच ठेवणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
जोर्वे येथे थोरात कारखान्याच्या वतीने स्नेह मेळावा संपन्न

जोर्वे येथे कारखान्याच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, नवनाथ अरगडे, मीनानाथ वरपे, सुरेशराव थोरात, बाबासाहेब ओहोळ, पांडुरंग पा.घुले, रंगनाथ खुळे, नानासाहेब शिंदे, अंकुश ताजणे, रईस खान पठाण, सोपान खुळे, रावसाहेब दुबे, सौ.सुंदरबाई डुबे, योगेश दुबे, दिलीप नागरे, गुलाबराव देशमुख, रामनाथ कुटे,सतीश वर्पे,तुषार दिघे, सौ.मीनाक्षीताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी प्रथमता जोर्वे गावात सेवा सोसायटीची उभारणी करून सहकाराची संकल्पना रुजवली. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व.डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने साखर कारखान्याची उभारणी केली. सन 1968 मध्ये साखर कारखाना सुरू झाला. साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख आपण कायम उंचीवर नेला. आता 5500 मे. टन गाळप क्षमतेचा अद्ययावत कारखाना असून आतापर्यंत 5 कोटी युनिट वीज आपण कारखान्यातच तयार केली आहे. पारदर्शकपणा, सुसूत्रता आणि अचूक निर्णय हे कारखान्याच्या कामात आपले वैशिष्ट्य राहिले आहे. भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवरच कारखान्याची वाटचाल सुरू असून आपणही काळजीपूर्वक कुटुंबाप्रमाणे हा सहकार सांभाळला आहे. आणि आताही परंपरा नवीन संचालकांनीही पुढे सुरू ठेवावी.
कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आपल्यावर विश्वास टाकला. आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. ज्यांना अर्ज माघारी घ्यावया लावले त्यांनी ते घेतले त्यांचेही आभार. खूप पाठिंबा शेतकरी सभासदांनी आपल्याला दिला. आपल्या संस्था सुरळीतपणे सुरू आहे. राज्यासह देशात सहकार मोडीत निघत असताना संगमनेरचा सहकार मात्र इतरांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. तालुक्यातील जनतेने खूप प्रेम दिले त्यामुळे राज्यात मागील 40 वर्ष सलग नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि तालुक्याचा विकास करता आला. मंत्रीपदासह काँग्रेस पक्षाने दिलेल्या वरिष्ठ महत्त्वाच्या भूमिका आपण यशस्वी पार पाडल्या. तालुक्याला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पूर्वी खूप संघर्ष करावा लागला. भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याला हक्काचे 30 टक्के पाणी मिळावे म्हणून मीटर हटाव आंदोलन केले आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हक्काचे पाणी मिळाले. आपणही आपल्या न्याय हक्कांसाठी लढा सुरूच ठेवणार आहोत.जुन्या पिढीने खूप कष्ट केले त्याचाच परिणाम म्हणून आजची पिढी सुखाचे दिवस बघत आहे. त्यांचे कष्ट, परिश्रम समजून घेऊन आपली परंपरा व संस्कृती टिकवणे ही आता तरुण पिढीची जबाबदारी आहे. चुकीच्या कामांना त्वरित रोखली पाहिजे. आता केवळ राजकारणापुरता तरुणांचा वापर केला जातो. धर्म,जात, पंथ याच्या नावाखाली तरुणांना भडकवले जात आहे. याला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रवरेच्या हक्काच्या 30% पाण्यासाठी संघर्ष केला. साखर कारखान्याची उभारणी करून अमृत उद्योग समूहाची निर्मिती केली. यातील सर्व संस्था सुरळीत सुरू आहे. निळवंडे धरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले आहे. मात्र एन निवडणुकीच्या काळात धर्म, जातीचे राजकारण करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. शाश्वत विकासाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आगामी पुढील निवडणुकांतही आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. मतभेद व मनभेद विसरून पुन्हा जोमाने काम करावे असे आवाहन केले.डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. आणि हाच लौकिक जपण्यासाठी तरुणांनी भूलथापांना बळी न पडता सर्वसामान्यांच्या हिताच्या राजकारणाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी जोर्वे,कोल्हेवाडी, निंबाळे गावासह पंचक्रोशीतील युवक, नागरिक, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.