ब्रेकिंग

मनोलीत नागरिकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट

युवक व नागरिकांसाठी स्फूर्तीदायी चित्रपट

मनोलीत नागरिकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट

मनोलीत नागरिकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट

युवक व नागरिकांसाठी स्फूर्तीदायी चित्रपट

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचा समृद्ध वारसा आहे. संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान हे महाराष्ट्रातील माणूस कधीही विसरणार नसून महाराष्ट्र धर्म वाढविणारा छावा चित्रपट सगळीकडे लोकप्रिय ठरत असून आज मनोलीतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे हा चित्रपट पाहिला.मनोली गावातील मारुती मनोली तरुण मित्र मंडळाच्या वतीने  मंदिरासमोरील मध्यवर्ती ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी तरुण, विद्यार्थी, वृद्ध, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र धर्माची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची महती सांगणाऱ्या या चित्रपटाची सर्वत्र मोठी मागणी आहे.

जाहिरात

महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मोगलाविरुद्ध युद्ध छेडले. स्वतः औरंगजेब बादशहा महाराष्ट्रावर चाल करून आला. मात्र तरीही त्याला स्वराज्य जिंकता आले नाही. धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. या प्रेरणादायी बलिदानातून महाराष्ट्र पेटून उठला. आणि महाराष्ट्र गळायला आलेल्या औरंगजेबाला याच मातीत गाडले गेले. हा प्रेरणादायी इतिहास ज्वलंत करताना महाराष्ट्राच्या धगधगता इतिहास या चित्रपटाने समाजापुढे मांडला आहे. देशभरातून या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या या चित्रपटासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आणि आपल्या माय माऊलींना गावातच हा चित्रपट दाखवला. छावा हा केवळ चित्रपट नाही तर तो एक महाराष्ट्र धर्माची चळवळ ठरणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू आवरता आले नाही.तर चित्रपट सुरू असताना अनेकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या यावेळी सर्व उपस्थित सर्वांच्या अंगावर अनेकवेळा शहारे आले.

अभिजीत बेंद्रे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

कनोली गावचे ग्रामपंचायत सदस्य तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक अभिजीत बेंद्रे यांनी छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी असून ही पोस्ट चांगली चर्चेत आली आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!