चणेगांव येथील श्री रामेश्वर बाबा सप्ताहाची उत्साहात सांगता

चणेगांव येथील श्री रामेश्वर बाबा सप्ताहाची उत्साहात सांगता
चणेगांव येथील श्री रामेश्वर बाबा सप्ताहाची उत्साहात सांगता
आश्वी । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात नैमित्तीक काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकिर्तन, भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या वतीने आयोजित चणेगांव व पंचक्रोशीतील लोकांसाठी भव्य रक्तदान शिबीरात मोठया संख्येने तरुणांनी रक्तदान केले.
मार्ग दावुनी गेले आधी । दयानिधी संत ते || तेणेची पंथे चालु जाता। न पडे गुंथा कोठे काही || या उक्ती प्रमाणे संतांनी दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमन केले असता जीवनातील अडथळे दुर होतात. व जीवन सुखमय होते. याचीच अनुभुती या सप्ताह काळात आल्याचे पहावयास मिळाले. या अखंड हरिनाम सप्ताह काळात लोकउपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने सात दिवस दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नामवंत किर्तनकारांचे किर्तनाचे आयोजन केले गेले व किर्तनसेवा संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आहे.

या कार्यक्रमासाठी चणेगांवसह पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताह काळात किर्तनाचा व महाप्रासादाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातुन ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणुक काढण्यात येवून व प्रत्येक घराच्या दाराभोवती सडा रांगोळी काढुन ग्रंथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत ह.भ.प.अमोल महाराज पिसे यांच्या सुश्राव्य वानितुन काल्याची किर्तन सेवा पार पडली.