ब्रेकिंग

विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहील्यानगर । प्रतिनिधी । विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे,उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून जिल्हाधिकरी कार्यालय, जिल्हा परीषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने टंचाईच्या परीस्थीतीवर मात करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथील पालक मंत्री कार्यालयात जनता दरबारच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या, प्राप्त झालेल्या अर्जावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांची बैठक घेवून जिल्ह्यातील सर्वच प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्यपुर्वक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

जाहिरात

राज्य सरकारने शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आहेच.पण यामध्ये कार्यालयांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,जलसंपदा विभाग आपल्याकडे असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल पाण्याची मागणी वाढणार असल्याने नियोजनात कोणत्याही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या.सर्व विभागांनी एकत्रितपणे यासाठी काम करावे.रोजचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाॅर रुमला कसा येईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.बिबटयांचा वाढता संचाराचे मोठे आवाहन असून पिंजरे लावूनही बिबटे सापडत नाही.यासाठी द्रोणचा अधिक वापर करावा.आज पालकंमंत्री विखे पाटील यांच्या दरबारा मध्ये प्रामुख्याने अहील्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नागरीकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज सादर झाले. दुपारी दोन वाजेपासून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला.प्रत्येक नागरीकाचा अर्ज स्विकारून त्याची सविस्तर माहीती त्यांनी जाणून घेतली.व्यक्तिगत संवादातून त्यांनी नागरीकांच्या समास्यांचे यशस्वीपणे निराकरण केले.जनता दरबारात प्रामुख्याने अहील्यानगर महापालिकेच्या संदर्भातील असल्याचे पाहायला मिळाले.रिकाम्या जागांचे वाद तसेच महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणावर कारवाई व्हावी आशा मागणीसाठी जनता दरबारात नागरीकांची संख्या अधिक होती. परीवहन भूमी अभिलेख, जलसंपदा, महावितरण या विभागाच्या संदर्भातील अर्ज जनता दरबारात मंत्री विखे पाटील यांना प्राप्त झाले आहेत.प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर गांभिर्याने कारवाई करून पालक मंत्री कार्यालयास संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकंमंत्र्यांनी अधिकार्यांना दिल्या.निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महापालीकेचे आयुक्त यशवंत डांगे,कृषी विभागाचे सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाच्या सायली पाटील स्वप्निल काळे वीज वितरण कंपनीचे अभियंता चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!