जयहिंदच्या वतीने गुरुवारी लोकशास्त्र सावित्री हे मोफत नाटक
जयहिंदच्या वतीने गुरुवारी लोकशास्त्र सावित्री हे मोफत नाटक
जयहिंदच्या वतीने गुरुवारी लोकशास्त्र सावित्री हे मोफत नाटक

याबाबत अधिक माहिती देताना सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने जयहिंद महिला मंच आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता वेल्थ क्रिएशनच्या सहसंस्थापक शर्मिला देशमुख यांचे आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.तर सायंकाळी 6 वा. थिएटर ऑफ रिलीव्हन्स यांच्या वतीने मंजूर भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेले आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळालेले लोकशास्त्र सावित्री हे नाटक होणार आहे. या नाटकामध्ये मंजूर भारद्वाज, अश्विनी नांदेडकर, सायली पावस्कर,कोमल खामकर, तुषार मस्के, नृपाली जोशी, संध्या बाविस्कर,आरोही बाविस्कर, प्रियंका कांबळे,तनिष्का लोंढे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, शर्मिला देशमुख, दिग्दर्शक मंजुल भारद्वाज, युनियन बँकेचे गणेश गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या नाटकासाठी व व्याख्यानासाठी संगमनेर मधील सर्व महिला नागरिक व युवक युवतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन, युनियन बँक ऑफ इंडिया आणि थोरात महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



