धोंडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
शेतकरी माध्यमिक विद्यालयात स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना पेन वाटप

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अथांग कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सोमवार दि २४ मार्च रोजी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सरपंच राजेंद्र नेहे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नेहे,सतिश काकडे,भाऊसाहेब भडांगे,नवनाथ भडांगे,साईनाथ नेहे, चेअरमन वाल्मिक नेहे,बबन भडांगे,व्हा.चेअरमन एकनाथ दरेकर, शांताराम नेहे,गणेश नेहे,संजय सरवार,प्रा.गायकर सर तसेच शिक्षक – शिक्षिका विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नेहे यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिवादन करतांना सांगितले माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशातील सहकार, चळवळीला दिशा देण्याचे उत्तुंग काम केले. सात दशके त्यांनी समाजकारण, राजकारण, शिक्षण, शेती, सहकार, सांस्कृतीक, साखर कारखानदारी आदि क्षेत्रांत केलेले काम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे असे बोलून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.