संगमनेर हे हिरवाईने नटलेले वृक्षांचे शहर – सौ.दुर्गाताई तांबे
आषाढी एकादशी निमित्ताने संगमनेरात 2525 झाडांचे रोपण
संगमनेर हे हिरवाईने नटलेले वृक्षांचे शहर – सौ.दुर्गाताई तांबे

संगमनेर हे हिरवाईने नटलेले वृक्षांचे शहर – सौ.दुर्गाताई तांबे
आषाढी एकादशी निमित्ताने संगमनेरात 2525 झाडांचे रोपण

सौ.दुर्गाताई तांबे यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा
संगमनेर । प्रतिनिधी । माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक मिळवला आहे. नागरिकांना आधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबर नगरपालिकेने स्वच्छतेत देश पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवस व आषाढी एकादशीच्यानिमित्त शहरात 2525 वृक्षांची रोपण करण्यात आल्यातून तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन साजरा करण्यात आला.संगमनेर मध्ये समता नगर, मार्केट कमिटी, पवार मळा, गंगामाई घाट यांसह विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉ.मैथिलीताई तांबे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.प्रमिला अभंग यांच्यासह शहरातील विविध महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने स्वच्छता व वृक्षारोपणासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार व सुमारे 10 कोटींचे बक्षिसे मिळवले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरात विकासाच्या अनेक योजना राबविण्यात आले आहेत. शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईन द्वारे स्वच्छ पाणी मिळत असून हायटेक बस स्थानक, प्रांताधिकारी कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालय भूमिगत गटारे, हॅपी हायवे, प्रवरा नदीवर विविध पूल बायपास, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, भव्य स्टेडियम यांचा अनेक अत्याधुनिक सुविधा व विविध 24 गार्डन निर्माण करण्यात आले आहेत. गंगामाई घाटाच्या सुशोभीकरणासह विकासाच्या विविध योजनांमुळे हा परिसर सुंदर व रमणीय ठरला आहे.दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख असलेल्या सौ.दुर्गाताई तांबे या अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करत असून या वाढदिवसानिमित्त यावर्षी शहरात 2525 वृक्षांचे रोपण करण्यात आले व या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपण व संवर्धनाची जबाबदारी कार्यकर्ते घेत असून हा दिवस तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
संगमनेर शहर हे हिरवाईने नटलेले वृक्षांचे शहर – सौ.दुर्गाताई तांबे
मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा फुल, झाडे याचबरोबर मोकळ्या जागेमध्ये झाडे रोपण करण्यात आले आहे. आज ही झाडे सर्व मोठी झाली असून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना या झाडांची छान गार सावली मिळत आहे. शहरातील जास्त वृक्षांच्या संख्येमुळे ऑक्सिजनचे चांगले प्रमाण असून थंड हवेचे प्रमाणही वाढले आहे. विकास कामांबरोबरच सुरक्षित स्वच्छ सुंदर आणि कुटुंबाप्रमाणे असणारे संगमनेर हे शहरातील नागरिक व महिलांच्या सहकार्यातून हिरवाईचे व झाडांचे शहर म्हणून नावारूपास आले असल्याचे गौरवउद्गार सौ दुर्गाताई तांबे यांनी काढले आहे.



