ब्रेकिंग

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

मा. कृषिमंत्री लोकनेते  बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन


मा. कृषिमंत्री लोकनेते  बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

संगमनेर । प्रतिनिधी । आपल्या गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने संपूर्ण देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना अनिल शिंदे म्हणाले की, मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा. आ. डॉ सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मधील विविध शाखांनी गुणवत्तेने आपला लौकिक निर्माण केला आहे. उत्कृष्ट निकालासह कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळत आहे. इंजीनियरिंग, पॉलीटेक्निक सह सर्व विभागांनी मानांकन प्राप्त केले आहे .संस्थेचे संस्थापक थोरस्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अमृतवाहिनी संस्थेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता.

जाहिरात
मा.कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय सुरू झाले आहे. याचबरोबर अमृतवाहिनी नावामुळे दोन्ही वर्षी पहिल्या फेरीतच प्रवेश फुल झाले आहेत. महाविद्यालयाकरता संस्थेने प्रशस्त जागा उपलब्ध केली असून सर्व सुविधा असलेली अद्यावत इमारत बांधण्याचे नियोजित केले आहे. वेल्हाळे येथील डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात ही कृषी महाविद्यालयाची इमारत उभी राहणार आहे.बुधवारी या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होत असून यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी विश्वस्त  सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!