ब्रेकिंग

झाडांचे शहर संगमनेरात उन्हाळ्यातही गारवा

भर उन्हाळ्यात नागरिकांना झाडांची सावली

झाडांचे शहर संगमनेरात उन्हाळ्यातही गारवा


झाडांचे शहर संगमनेरात उन्हाळ्यातही गारवा

भर उन्हाळ्यात नागरिकांना झाडांची सावली

संगमनेर । प्रतिनिधी ।  महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकास कामांमुळे वैभवशाली ठरला आहे. शांतता, सुरक्षितता, शिक्षण, मुबलक पाणी, स्वच्छता, गार्डन, आरोग्य, बँकिंग , आणि बंधू भावाचे वातावरण यांसह सर्व सोयीमुळे संगमनेरात वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या संगमनेर मध्ये दररोज लाखो नागरिकांची वर्दळ होत असून ऐन उन्हाळ्यामध्ये या नागरिकांना शहरांमध्ये असलेल्या गर्द झाडांमुळे सावलीचा दिलासा मिळत आहे.

तत्कालीन नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे नेतृत्वाखाली शहरात स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबविण्यात आले. शहरातील प्रत्येक रस्त्यावरील दुतर्फा लावण्यात आली आहे .आता ही झाडी मोठी झाली असून ही झाडे प्रवाशांसाठी जणू वरदानच ठरत आहे.

झाडांचे हिरवे शहर म्हणून ओळख

वाढत्या शहरीकरणामुळे नवनवीन रस्ते तयार होत असले  तरी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्या नियोजनामुळे शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करत असतात. वृक्षांमुळे शहरात ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले असून संगमनेर शहर ही हिरवाईने नटलेले झाडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

सध्या एप्रिलच्या महिन्यात उन्हाळ्यातील तापमानात वाढ झाल्याने भर दुपारी प्रचंड उष्णता निर्माण होते .अशा वेळी बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांना संगमनेर शहरातील झाडे ही मायेची सावली देत आहेत.  हीच झाडे आता वाहनचालकांचा उन्हापासून बचाव करत आहे. भर उन्हात गाडी चालवल्यानंतर या झाडांची सावली काही क्षण का होईना प्रवाशांना  वेगळा आनंद देत असल्यामुळे संगमनेर शहरातील रस्त्यावरची झाडे आता आधारवड ठरली आहे.

जाहिरात

स्वच्छ संगमनेर, सुंदर  संगमनेर व  हरीत संगमनेर या संकल्पने अंतर्गत नगरपालिकेने केलेल्या वृक्षारोपणामुळे आता सर्वांनाच हा गारवा हवाहवासा वाटत आहे. शहरात ठिकठिकाणी ही झाडे सर्वत्र दिसतात. संगमनेर हे थंड हवेच्या ठिकाणाबरोबर आरोग्यासाठी महत्त्वाच्या ऑक्सिजनचे प्रमाण असलेले शहर ठरत आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॅपी हायवे असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावर डिव्हाईडर मध्ये अनेक झाडे आहे. ती सुंदर दिसू लागली आहेत .

जाहिरात

शहरातील अकोले नाका ते बस स्थानकापर्यंत दुतर्फा अनेक झाडं आहेत, मालदाड रोड, डी एड कॉलेज सर्कल ते अकोले बायपास रस्ता, दिल्ली नाका ते पंचायत समिती, राज हॉटेल पॅलेस ते स्वामी समर्थ मंदिर, म्हाळुंगी नदीचा बायपास रस्ता, नवीन नगर रस्ता (राजपाल क्लाथ स्टोअर्स) ते मालपाणी हॉस्पिटल (जाणता राजा मैदान), भूमी अभिलेख कार्यालयाचा परिसर, मेडी कव्हर हॉस्पिटलचा परिसर, शासकीय विश्राम गृह, उपनगरात, नगरपालिका परिसर शहरातील आशा अनेक ठिकाणी झाडांची गर्दी असून दाट सवलीमुळे प्रवाशी तसेच पादचाऱ्यांना काही वेळ का होईना गारवा मिळत असल्याने नागरपालिके बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. वृक्षारोपण संवर्धन याबाबत नगरपालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषिकेही मिळाली आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!