ब्रेकिंग

थोरात कारखान्याच्या तत्परतेमुळे डोंगरावर लागलेली आग आटोक्यात

सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगरावरील आग अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आटोक्यात

थोरात कारखान्याच्या तत्परतेमुळे डोंगरावर लागलेली आग आटोक्यात
थोरात कारखान्याच्या तत्परतेमुळे डोंगरावर लागलेली आग आटोक्यात

सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगरावरील आग अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आटोक्यात
संगमनेर । प्रतिनिधी । थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात दंडकारण्य  अभियान हे  सायखिंडी येथील डोंगरावरूनच सुरू झाले. या परिसरात सह्याद्री देवराई संस्थेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला असून आज  दुपारी लागलेल्या आगीला व्हीजवण्यासाठी थोरात कारखान्याच्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवल्याने ही आग तातडीने आटोक्यात आली.

लोकनेते बाळासाहेब थोरातयांच्या मार्गदर्शनाखाली सहकार  महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सातत्याने विकासामध्ये योगदान दिले आहे. याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेतला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची मोठी लोक चळवळ झाली आहे. वृक्षरोपण व संवर्धनाचे मोठे काम या चळवळीच्या  माध्यमातून दरवर्षी होत आहे.

जाहिरात

उन्हाळ्यामध्ये अनेक डोंगरांवर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर कारणांमुळे आग लागली जाते आणि त्यातून नैसर्गिक आणि जीवसृष्टीसह वृक्षांची मोठी हानी  होते. अशा आगी लागू नयेत याकरता दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने जनजागृती सातत्याने सुरू असते.

जाहिरात

आज दुपारी साईखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगरावर लागलेल्या आगीची बातमी कळतात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या तत्परतेने ही आग विझवली. यासाठी कारखान्याने मोठी मदत केली. यामुळे जंगलाचा मोठा भाग वाचवण्यात यश आले असून जीवसृष्टी व पर्यावरणाची हानी टळली आहे.सह्याद्री देवराई च्या उभारणीसाठी सिने अभिनेते सयाजी शिंदे त्याचप्रमाणे सह्याद्री देवराईचे प्रणेते सिताराम राऊत व इतर कार्यकर्ते वनविभागाचे कर्मचारी यांनीही अत्यंत मोलाचे काम केले आहे. कारखान्याने केलेल्या तत्परतेच्या मदतीबद्दल सिताराम राऊत यांच्यासह सायखिंडी परिसरातील नागरिकांनी  कारखाना व अग्निशामन दलाचे आभार व्यक्त केले आहे. वन विभाग स्थानिक कर्मचारी आणि कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्परतेच्या कामाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे डॉ.जयश्रीताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, व्हा. चेअरमन संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!