ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात  यांच्यामुळेच उन्हाळ्यात दोन्ही कालव्यांना पाणी

थोरात कारखान्याची शेतकऱ्यांना मोठी मदत

लोकनेते बाळासाहेब थोरात  यांच्यामुळेच उन्हाळ्यात दोन्ही कालव्यांना पाणी

लोकनेते बाळासाहेब थोरात  यांच्यामुळेच उन्हाळ्यात दोन्ही कालव्यांना पाणी
थोरात कारखान्याची शेतकऱ्यांना मोठी मदत
संगमनेर । प्रतिनिधी । उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या सततच्या कामामुळे व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीमुळे उजव्या व डावा कालव्यातून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळत आहे.निळवंडे धरणातून सध्या दोन्हीही कालव्यांमधून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. याबाबतची मागणी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली होती. सध्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव विभागातील गावांना या कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. हे पाणी पोहोचवण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून काम झाले आहे विविध ठिकाणी चर टाकण्यात आले आहे . यामधून तळेगाव भागातील विविध गावांमधील बंधारे भरण्याचे काम सुरू आहे.

याचबरोबर थोरात कारखान्याच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचे पाईप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्या पाईप मधून पाणी उचलले जात आहे. उजव्या कालव्यावरील संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक , नांदुरी दुमाला, धुळे हिवरगाव पावसा शिरापूर ते झरेकाटीपर्यंत विविध गावातील शेतकऱ्यांनी पाईपाच्या माध्यमातून पाणी उचलले आहे.यामुळे अनेक गावांमध्ये शेततळी भरली असून भर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निळवंडे धरण व कालवे हे दुष्काळी गावांसाठी असून या उन्हाळ्यामध्ये आवर्तन मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले असल्याचे चिंचोली गुरव येथील शेतकरी संदेश गोडगे यांनी म्हटले आहे.तर उन्हाळ्यामध्ये ही पाणी मिळत असल्याबद्दल विविध गावांमधून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति नागरिकांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे.कोणतीही काम सहजासहजी होत नाही सातत्याने पाठपुरावा करून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी धरण पूर्ण केले आहे. आज सत्ता ज्यांची आहे त्यांनी या कामात कोणतीही योगदान दिले नाही. संगमनेर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला अजून गावे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे पाणी देणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति आम्ही कृतज्ञ असल्याचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीराम मुंगसे गुरुजी यांनी म्हटले आहे

वितरिकांचे कामही तातडीने सुरू करावे

कालव्यांची व धरणाचे काम हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे याचबरोबर वितरिकांच्या कामाचे नियोजन त्यांनी केले होते. यासाठी सर्व मंजुरी या पूर्ण केल्या आहेत. कालव्यांच्या खालच्या भागाला जसे पाणी मिळत आहे तसेच पाणी वर देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नियोजित आराखडा तयार केला आहे. हा आराखडा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजूर केला असून डाव्या व उजव्या कालव्यावरील सर्व वितरिकांचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी सचिन दिघे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!